Tuesday, April 23, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडप्रांताधिकाऱ्यांची कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या शिष्टमंडळासोबत बैठक

प्रांताधिकाऱ्यांची कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या शिष्टमंडळासोबत बैठक

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महसूल विभागात शासकीय लिपी राजमुद्रा अधिकाऱ्यांच्या हुबे हुब सह्यांचा वापर करून बिगर शेती गुंठेवारी इनाम जमिन पत्रकांचा बनावट वापर सुरू असून यामध्ये कोट्यावधी रुपयांची शासकीय महसूल उडवून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होऊन अनेक गरीब कुटुंबे देशोधडीला लागली आहेत.

या प्रकरणाची चौकशी करण्याचे अधिकार करवीर प्रांत वैभव नावडकर करीत असून आज त्यांनी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेऊन संदर्भीय घोटाळ्याच्या चौकशी संदर्भात ३० ऑगस्ट २०२१ पूर्वी पूर्ण करून ३० ऑगस्ट रोजी अहवाल जिल्हाधिकार्‍यांकडे पाठवून जाहीर करतो व दोषी आढळणाऱ्या  गुन्हेगारांवर कारवाईची प्रक्रिया सुरू होईल असे सांगितले.

समितीच्या कार्यकर्त्यांनी आजही असे बनावट दस्ताची आदेश शासकीय व्यवहारात निदर्शनास येत आहेत तरी या आदेशांना पायबंद घालण्यासाठी महसूल विभागाने म्हणजेच जिल्हाधिकाऱ्यांनी ताबडतोब अशा बनावटगिरी करून शासनाला व सामान्य लोकांची फसवणूक करणाऱ्यांवर त्वरित फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई करावी असा आग्रह बैठकीमध्ये करण्यात आला.

प्रांत अधिकारी करवीर नावडक सोबत कोल्हापूर शहर व नागरी कृती समितीचे रमेश मोरे, अशोक पवार, अजित सासणे, भाऊ घोडके, चंद्रकांत सूर्यवंशी, पंपू सुर्वे यांची बैठक पार पडली. यावेळी कार्यालयात बिगर शेती, गुंठेवारी इनामी जमिनी वर्ग करण्या संदर्भात २०१२ ते २०२० या काळात बिगरशेती, गुंठेवारी, इनामी जमिनीचे बनावट आदेश काढून शासनाची महसूल बुडवून शासनाची फसवणूक केली या बाबत

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय