नांदेड : नांदेड शहरातील आरोग्य विभागात आशांच्या स्थानिक मागण्या संदर्भात यशस्वी बैठक संपन्न झाली, प्रशासनाने सकारात्मक चर्चा करत स्थानिक प्रश्न सोडण्यात येतील, असे आश्वासन दिले.
कोविड – १९ संपेपर्यंत ग्रामपंचायतीकडून १००० रुपये प्रोहोत्साहन पर भत्ता मिळावा, सर्व आशा व गटवतर्गक यांना पुरेशा प्रमाणामध्ये सुरक्षा साधने मिळावीत, ( N95 मास्क , हँडग्लोज , सॅनिटायझर , फेसशिल्ड , PPE किट , रेनकोट ) कारण सध्या समूह संसर्गाचा प्रचंड धोका वाढला आहे, जुलै पासुन २,००० रुपये, आशांचे व ३,००० रुपये गट प्रवर्तकांचे मानधन वाढ शासनाकडून प्रलंबित आहे, त्याची अंमलबजावणीत्वरीत करावी, कोणतीही कपात राज्य सरकार कडून करण्यात येऊ नये, कोविड – १९ सर्वेक्षणाचे प्रती दिन ३०० रुपये प्रमाणे भत्ता मिळावा, आदी मागण्या करण्यात आल्या होत्या.
आरोग्य अभियानाचे शहर व्यवस्थापक सुहास सोनुले आणि शहर लेखा व्यवस्थापक लखन बोळेगांवे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत आशा व गट प्रवर्तक फेडरेशनचे सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड यांनी दि. ५ सप्टेंबर रोजी झालेल्या आंदोलनातील मागण्या मांडून तात्काळ सोडविण्यासाठी विनंती आरोग्य अभियानातील अधिकाऱ्यांंकडे करण्यात आली. सर्व मागण्या संदर्भात सकारात्मक चर्चा होऊन स्थानिक प्रश्न सोडविण्यात येतील असे अश्वासन सोनुले यांनी दिले.
शहरातील १५ झोन पैकी १३ झोनच्या प्रमुखांनी प्रतिनिधी स्वरूपात आपली उपस्थिती दर्शविली होती. राज्य आणि केंद्र स्तरावरील मागण्या घेऊन पुढेही लढा कायम राहील असे सर्वानुमते ठरले असून कोविड-१९ मध्ये आपले कर्तव्य चोख बजाणार असल्याचे सर्व आशा प्रतिनिधींनी बोलून दाखविले