Friday, December 6, 2024
Homeराज्यसफाई कामगारांच्या पाल्यांना वारसा हक्क नियमानुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री...

सफाई कामगारांच्या पाल्यांना वारसा हक्क नियमानुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश

मुंबई : जे.जे. समूह रुग्णालयातील ज्या सफाई कामगारांच्या पाल्यांना वारसा हक्काने शासकीय सेवेत नियमानुसार सामावून घेण्याची प्रक्रिया प्रलंबित आहे. अशा कर्मचाऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने वारसा हक्काअंतर्गत शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या प्रक्रियेस गती देऊन प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले.

मंत्रालयात जे.जे. रूग्णालय आणि सेंट जॉर्ज रूग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासंदर्भात मंत्री देशमुख यांनी शासन सकारात्मक असल्याचे सांगितले. या बैठकीस वैद्यकिय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.तात्याराव लहाने, जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.माणकेश्वर, अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस युनियनचे गोविंदभाई परमार आदिसह सफाई कामगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख म्हणाले,  २०१४, २०१७ आणि २०२१ नुसार ज्या सफाई कामगारांना अद्याप वारसा हक्कानुसार शासकीय सेवेत सामावून घेतले नाही. अशा कामगारांना नियमानुसार कायमस्वरूपी सामावून घेण्यासाठीच्या प्रक्रियेस गती द्यावी तसेच चतुर्थ श्रेणी पदासाठी भरण्यात येणाऱ्या जागा या बाह्यकृत सेवेद्वारे भरण्यात येतील. मात्र, जे कामगार पिढ्यादर पिढ्या सफाई कामगारांचे काम करीत आहेत, त्यांना या भरतीमध्ये प्रथम प्राधान्य देण्यात यावे, अशा सूचनाही मंत्री देशमुख यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. चतुर्थ श्रेणी कामगारांना घरे उपलब्ध करून देण्याबाबत त्यांच्या अन्य समस्या सोडविण्यासंदर्भातही शासन सकारात्मक असल्याचे अमित देशमुख यांनी यावेळी उपस्थित सफाई कर्मचाऱ्यांना आश्वासित केले.

संबंधित लेख

लोकप्रिय