Thursday, August 11, 2022
Homeग्रामीणजुन्नर : सोमतवाडी कोव्हीड केअर सेंटर येथील रुग्णांना लांडे कुटुंबियांकडून मासवडीचे जेवण

जुन्नर : सोमतवाडी कोव्हीड केअर सेंटर येथील रुग्णांना लांडे कुटुंबियांकडून मासवडीचे जेवण

spot_imgspot_imgspot_imgspot_img

जुन्नर सोमतवाडी कोव्हीड केअर सेंटर येथील रुग्णांना लांडे कुटुंबियांकडून मासवडीचे जेवण देण्यात आले.

सोमतवाडी कोविड सेंटर हे स्वत:चे घर आहे. असे समजून आम्ही येथे काम करतोय. सेंटर चालु झाल्यापासून दररोज सकाळी २ अंडी व दर रविवारी मटणाचे जेवण जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे, केवाडी गावचे सरपंच अमोल देवराम लांडे व सर्व लांडे कुटुंबियांंकडून दिले जात आहे.

एक वयोवृध्द बाबा त्याठिकाणी रूग्ण म्हणुन आहेत. ते लांडे साहेबाना म्हणाले मी माळकरी आहे मला मासवड्या फार आवडतात. माझी नात चांगली बनवते मला पण खायची इच्छा झालीये. देवराम लांडे यांनी क्षणाचा विलंब न लावता बाबाना सांगितले की सर्व रूग्णासाठी आपण मासवडीचे जेवण देऊ. व त्यानुसार मासवडीचे जेवण सर्व रूग्ण व डॅाक्टर , नर्स व कर्मचारी यांना जेवू घातले.


व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय