Friday, March 29, 2024
Homeराजकारणखळबळजनक : रोहित पवारांच्या पराभवासाठी अजित पवारांनी प्रयत्न केल्याचा ‘या’ नेत्याचा दावा

खळबळजनक : रोहित पवारांच्या पराभवासाठी अजित पवारांनी प्रयत्न केल्याचा ‘या’ नेत्याचा दावा

मुंबई : आमदार रोहित पवार यांचा पराभव करण्यासाठी खुद्द अजित पवार यांनी प्रयत्न केल्याचा आरोप शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे. आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आमदार रोहित पवार यांना पाडण्यासाठी खुद्द अजित पवार यांनी फिल्डिंग लावल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची सदस्य म्हणून निवड झाली. तसेच त्यांची एमसीएच्या अध्यक्षपदीही निवड करण्यात आली.

शिंदे गटाचे नेते व ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्या आरोपामुळे ही निवडणूक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. म्हस्के यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारांवर टीका करताना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रोहित पवारांना पाडण्याचा प्रयत्न खुद्द अजित पवार यांनी केल्याचा खळबळजनक दावा केला आहे.

नरेश म्हस्के म्हणाले, ‘पवार फॅमिलितील कोणती व्यक्ती रोहित पवार यांना पाडा म्हणून सगळ्यांना निरोप देत होते, अजित पवार साहेब, आधी आपलं घरातलं बघा आणि नंतर मुख्यमंत्र्यांवर टीका करा, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रोहित पवार उभे होते. त्यांना पाडण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी केल्याचा आरोप म्हस्के यांनी केलाय.

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय