Tuesday, January 21, 2025

मावळचे पहिले खासदार गजानन बाबर यांचे निधन !

पिंपरी चिंचवड : पुणे जिल्ह्यातील मावळ लोकसभा मतदारसंघाचे प्रथम खासदार, हवेलीचे माजी आमदार गजानन बाबर यांचे आज (बुधवारी) निधन झाले. ते 79 वर्षाचे होते. बाबर मूळचे सातारा जिल्ह्यातील वाई येथील होते. ते रेशन फेडरेशनचे अध्यक्ष होते.

1990 च्या दशकात पिंपरी चिंचवड शहरात त्यांनी शिवसेना स्थापन केली. चिंचवडच्या काळभोर भागातून ते पिंपरी-चिंचवड महापालिकेवर शिवसेनेच्या चिन्हावर नगरसेवक म्हणून निवडून आले. महापालिकेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी काम केले.

आयपीएल – 2022 साठी लिलावासाठी क्रिकेटपटूंची यादी जाहीर

तत्कालीन हवेली विधानसभा मतदारसंघाचे बाबर यांनी सलगदोनवेळा विधिमंडळात प्रतिनिधित्व केले. 2009 मध्ये मावळ लोकसभा मतदार संघातून प्रथम खासदार म्हणून संसदेत प्रवेश केला.

नगरसेवक, आमदार व खासदार असा त्यांचा प्रवास राहिला. पाणीवाला आमदार म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोघे भाऊ मधुकर व प्रकाश बाबर आहेत. ते बऱ्याच दिवसांपासून लिव्हर कॅन्सरच्या आजाराने त्रस्त होते. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. एका खाजगी रुग्णालयात त्यांचे निधन झाले.

ओबीसी आरक्षण विधेयकावर राज्यपालांची स्वाक्षरी

शेतकरी – कामगार बेरोजगारांची निराशा करणारे बजेट – कामगार नेते डॉ. डी. एल. कराड


Related Articles

- Advertisement -

Latest Articles