Friday, July 12, 2024
Homeजिल्हामावळ : सुदवडी येथे माकप, जनवादी महिला संघटनेचे थाळीनाद आंदोलन

मावळ : सुदवडी येथे माकप, जनवादी महिला संघटनेचे थाळीनाद आंदोलन

मावळ : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने व अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने सुदवडी जांभवडे या खराब रस्त्यावर थाळीनाद आंदोलन करण्यात आले.

सुदवडी जांबवडे हा रस्ता खूप खराब असल्याने तेथील नागरिकांना व महिलांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. रात्री – बेरात्री कामगार कष्टकरी ये – जा करत असतात. रस्त्यावरून जाता-येता खूप जणांना दुखापत झाली असून झाली असून नाहक त्रास सहन करावा लागत आहे महिला मुलांना शाळेमध्ये  येत जात असताना जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागत आहे. या अगोदरही या रस्त्यासाठी मावळ तहसीलदारांना निवेदन दिले होते, तसेच आमदारांनाही निवेदन दिले होते.

ग्रामपंचायत सदस्य व सरपंच, जिल्हा परिषद सदस्य यांना वारंवार निवेदने दिली असता तरीदेखील या प्रश्नाकडे कोणीही लक्ष देत नाही. प्रशासन अपघात होण्याची वाट पहात आहे का ? असा सवाद ग्रामस्थ करत आहेत.

सर्व प्रतिनिधींनी या प्रश्नाकडे लक्ष दिले नाही तर येत्या 20 तारखेला महिला, कामगार व मुले तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करतील, असा इशाराही देण्यात आला आहे.

यावेळी सुदवडीचे शेतकरी ज्ञानोबा कराळे पाटील, जांभवडे चे ग्रामपंचायत सदस्य मंगेश भोसले, साई सृष्टी येथील ऍडव्होकेट शाम दराडे, नारायण काळे, विठ्ठल कदम, उत्तम कदम, शरद पाटील, एडवोकेट शाम दराडे, गजानन रताळे, दत्ता उजागरे, चंद्रकांत जाधव, संभाजी जाधव, पावसू करे, जनवादी महिला संघटनेच्या कार्यकर्ते सुप्रिया जगदाळे, अनिता करे, वृंदावनी चाटे, उषा पाटील, वैशाली राजगुरू, विद्या रताळे, शीतल जाधव, नीता उडगी, छाया पाटील, सीमा पाटील, मनीषा जाधव, शीतल जाधव इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. 

यावेळी अपर्णा दराडे, गणेश दराडे, पावसू करे, बाळासाहेब शिंदे, ज्ञानोबा कराळे, वृंदावनी चटे यांनी संबोधित केले. टाळ्या वाजून व घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. रस्ता लवकरात लवकर डांबरीकरण झाला पाहिजे अशी मागणीही करण्यात आली. जर रस्ता लवकरात लवकर डांबरीकरण केला नाही मोठे आंदोलन छेडण्याचा ठराव करण्यात आला.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय