Friday, April 19, 2024
Homeजिल्हामावळ : सुदवडी - जांभवडे रस्त्याचे दुरूस्तीकरण पावसाआधी करा - माकप 

मावळ : सुदवडी – जांभवडे रस्त्याचे दुरूस्तीकरण पावसाआधी करा – माकप 

मावळ : आज दिनांक 29 जून रोजी मावळचे तहसीलदार मदसूदन बर्गे व पंचायत समीती चे बिडीओ यांना रस्ताच्या दुरुस्ती संदर्भात निवेदन देऊन, तहसीलदार आणि बिडीओ यांनी स्वतः येऊन सुदवडी जांभवडे रस्ताची पाहणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी गणेश दराडे म्हटले की, या रस्त्याच्या परिसरात मोट्या प्रमाणात कामगार वस्ती वाढत असून, रस्ताने ये – जा करणाऱ्याच्या संकेत खूप वाढ झाली आहे. रात्री, रात्र पाळी करून कामगार या रस्याने आपला जीव मुटीत धरून घरी येतात. अनेक मोटर सायकल स्लिप होऊन अनेकांचे हात पाय मोडलेले असून याच रस्त्यावर लहान मुलांचे ने – आण करणाऱ्या शाळेच्या गाड्या ही चालतात. भविष्यत मोठा अपघात होण्याचा धोका आहे, तरी प्रशासन आणी लोकप्रतिनिधींनी त्वरित लक्ष घालून रस्ता दुरूस्ती करावी.

कोण स्थानिक आणि कोण बाहेरचा असा भेद न करता सर्वच या महाराष्ट्रचे आणि या देशाचे नागरिक आहेत हे ध्यानात घेऊन प्रश्न सोडवायला हवा, अन्यथा भर पाऊसात मुलाबाळांसह प्रशासनासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

निवेदन देता वेळीस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षचे पुणे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड गणेश दराडे, किसान सभेचे बाळासाहेब शिंदे, नामदेव सूर्यवंशी, डी वाए एफ आय चे पाऊसू करे, जनवादी महिलांना संघटनेच्या नेत्या अपर्णा दराडे, सुरेखा दराडे, अशोक उजागरे, गजानन बोडके, कुंडलिक सिरसट, प्रवीण बोडके, विनोद बोडके, शिवाजी सोनवणे इत्यादी नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय