Thursday, October 10, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडMaval : मावळ मुळशी प्रांत कार्यालयावर प्रांत अधिकाऱ्यांची "नोटतुला आंदोलन "

Maval : मावळ मुळशी प्रांत कार्यालयावर प्रांत अधिकाऱ्यांची “नोटतुला आंदोलन “

करोडो रुपयांचा महसूल बुडवणाऱ्या बिल्डरांना पाठीशी घालणाऱ्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर कारवाई करा – अपना वतन संघटना (maval)

मावळ : अवैध गौणखनिज च्या माध्यमातून करोडोंचा महसूल घोटाळा अपना वतन संघटनेने उघडकीस आणला आहे. पिंपरी चिचंवड मावळ मुळशी कार्यक्षेत्रामध्ये अनेक बांधकाम व्यावसायिक तलाठी, मंडलाधिकारी, तहसीलदार या महसूल अधिकाऱ्यांसोंबत संगनमत करून शासनाची दिशाभूल व फसवणूक करीत आहेत. (maval)

असाच एक प्रकार अपना वतन संघटनेने उघडकीस आणलेला आहे. सोनिगरा रिअलकॉन, क्रिसला इन्फोकोन, व्हीटीपी रियालिटी या बांधकाम कंपन्यांनी विना परवाना गौणखनिज उत्खनन केलेबाबत अपना वतन संघटनेने तक्रार केली होती. त्यानुसार या बिल्डरांना १० कोटींचा दंड लावण्यात आलेला होता. परंतु सदरचा दंड तत्कालीन प्रांत अधिकारी संदेश शिर्के, मुळशी तहसीलदार, नायब तहसीलदार श्रीकांत मिसाळ यांनी चक्क रद्द केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे.

त्यामुळे मंगळवार दि १०/०९/२०२४ रोजी अपना वतन संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालय बावधन याठिकाणी प्रांत अधिकाऱ्यांची ” नोटतुला ” हे अनोखे आंदोलन केले होते.

या आंदोलनावेळी नागरिक महिला यांनी आपापल्या समस्या मांडल्या व त्यांनीही तराजू मध्ये प्रांत अधिकारी यांची प्रतिमा ठेऊन दुसऱ्या बाजूला ५०० च्या नोटांचे बांदल ठेऊन प्रांत अधिकाऱ्यांची नोट तुला करीत आपला रोष व्यक्त केला.

यावेळी मावळ मुळशी प्रांताचे प्रांताधिकारी सुरेंद्र नवले यांनी आंदोलकांशी सविस्तर चर्चा केली.

अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख यांनी महसूल बुडवण्यास कारणीभूत असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली . यावेळी सदर प्रकरण पुनरावलोकनासाठी परवानगी देण्याचे आश्वासन दिले. तसेच इतर प्रकरणात उप जिल्हाधिकारी यांना अहवाल सादर केला जाईल अशी खात्री दिली. त्यामुळे सदरचे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

यावेळी आंदोलनामध्ये अपना वतन संघटनेचे कार्याध्यक्ष राजू शेरे, महिलाध्यक्ष राजश्री शिरवळकर, राज्य संघटक हमीद शेख, शहर प्रभारी जितेंद्र जुनेजा , शहर संघटक गणेश जगताप, शिवशाही व्यापारी संघटनेचे युवराज दाखले, आरपीआय ( A ) राज्य संघटक कैलास जोगदंड, रिपब्लिकन सेनेचे दत्ताभाऊ गायकवाड, युवा वादळ संघटनेचे युवराज भास्कर, तौफिक पठाण, वासिम पठाण, मलंग शेख, बाळासाहेब वाघमारे, रऊफ शेख, संतोष सुतार, कयूम पठाण, विकास पांडागळे, दीपक जाधव, युवा नेते प्रमोद शिंदे, अमोल सावदेकर, अमोल उबाळे, मछिंद्र गायकवाड, दादासाहेब ढवळे यांच्यासहित अनेक कार्यकारत मोठ्या संख्येने उपस्थित होते.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

संतापजनक : चौथीत शिकणाऱ्या तीन मुलींचा शिक्षकाकडून विनयभंग

ड्रायव्हींग लायसन्सच्या ‘स्मार्ट कार्ड’ रूपांतरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत

धक्कादायक : एसी दुरुस्त करताना स्फोट; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती

ब्रेकिंग : मलायकाच्या वडिलांची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

शेतात काम करताना विद्युत तारेचा स्पर्श, चार शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू

JCI : ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती

संबंधित लेख

लोकप्रिय