रेशनचा काळाबाजार व निकृष्ठ अन्नधान्य विरोधात तहसीलदाराना निवेदन
मावळ/क्रांतिकुमार कडुलकर:पंचायत समिती वडगांव मावळ येथे गट विकास अधिकारी पाटील साहेब यांना किसान सभा व अ.भा.जनवादी महिला संघटनेच्या वतीने भांडारवाडी सुदुंबरे,मावळ येथील पिण्याच्या पाण्याची दैनंदिन व्यवस्था करावी,जिल्हा परिषदेच्या शाळेत अतिरिक्त एक शिक्षक नेमून दोन शिक्षकी शाळा करावी.वस्तीवरील रस्त्याची देखभाल दुरुस्ती करावी,ईई मागण्यासाठी घेराव आंदोलन करण्यात आले.

यावेळी तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना रेशनिंग दुकानदाराविरोधात आदिवासींना निकृष्ट अन्नधान्य पुरवठा व रेशनिंगच्या खुलेआम काळा बाजार केला जात असल्याची तक्रार एका निवेदनाद्वारे करण्यात आली.आदिवासी वस्तीवरील रेशनदुकानात निकृष्ट दर्जाचे अन्नधान्य वितरण केले जाते.येथील सर्व कार्डधारकांना चांगल्या गुणवत्तेचे अन्नधान्य वेळेवर मिळाले पाहिजे,रेशनचा काळाबाजार रोखावा.खराब अन्नधान्य बदलून द्यावे.अशी मागणी जनवादी महिला संघटनेच्या अपर्णा दराडे यांनी निवेदनाद्वारे केली.

येत्या आठ दिवसात मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर किसान सभा व जनवादी महिला संघटना पुन्हा आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे.
या आंदोलनात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचेचपूणे जिल्हा सचिव कॉम्रेड गणेश दराडे यांचेसह किसान सभेचे कार्यकर्ते बाळासाहेब शिंदे,नामदेव सूर्यवंशी डॉ.बाबासाहेब देशमुख जनवादी महिला संघटनेच्यानेत्या अपर्णा दराडे,स्थनिक कार्यकर्त्या मीरा भांगे,जनाबाई जाधव,सोनाली जाधव,अर्चना जाधव,मनीषा जाधव,आकाश गावडे आदी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

