Monday, February 10, 2025

Maval : अर्थव्यवस्था वाढण्यासाठी शेती, शिक्षण क्षेत्रात गुंतवणूक आवश्यक – हर्षवर्धन पाटील

पिंपरी चिंचवड विद्यापीठात प्रजासत्ताक दिन उत्साहात (Maval)

मावळ (क्रांतीकुमार कडुलकर) – देशाची अर्थव्यवस्था वेगाने वाढण्यासाठी उच्च तंत्रज्ञानाची जोड देऊन शेती आणि शिक्षण क्षेत्रात मोठी गुंतवणूक होणे आवश्यक आहे. यासाठी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) माध्यमातून कुशल मनुष्यबळ आणि सुसंस्कृत जबाबदार नागरिक घडवण्याचे काम मागील ३२ वर्षांपासून सुरू आहे असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलपती हर्षवर्धन पाटील यांनी केले. (Maval)

साते, वडगाव मावळ येथे पिंपरी चिंचवड विद्यापीठात प्रजासत्ताक दिनानिमित्त हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, कुलगुरू डॉ. मणिमाला पुरी, प्र-कुलगुरू डॉ. सुदीप थेपाडे, मार्केटिंग हेड जमीर मुल्ला, सर्व विभाग प्रमुख, विद्यार्थी व पालक प्रतिनिधी उपस्थित होते.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles