Wednesday, February 5, 2025

लखीमपूर घटनेचा राजूर येथे भव्य जाहीर निषेध

राजूर कॉलरी : भाजपच्या केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्र टेनी यांच्या पुत्र आशिष मिश्र टेनी ह्याने उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांवर आपल्या वाहनाने मागाहून चढवून अमानुषपणे चिरडण्याचे दुष्कृत्य केले. ह्या घटनेच्या विरोधात राजूर येथे महाराष्ट्र बंद चे निमित्ताने भाजप सरकार च्या जाहीर निषेध दि ११ ऑक्टोबर रोजी शहीद भगतसिंग चौकात करण्यात आला.

या जाहीर निषेध आंदोलनात केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्र टेनी ह्यांना ताबडतोब बडतर्फ करा, झालेल्या घटनेची सखोल निष्पक्षपणे चौकशी करून संबंधितांवर कारवाई करा अशी मागणी करण्यात आली. 

या भाजप सरकार च्या विरोधात करण्यात आलेल्या जाहीर निषेध आंदोलनात डेव्हिड पेरकावार, मो. असलम, कुमार मोहरमपुरी, नंदकिशोर लोहकरे, सरोज मून, धनराज देवतळे, साजिद खान, जयंत कोयरे, राजेंद्र पुडके, श्रावण पाटील, समीर बेग, विनोद बलकी, शिवदास चालखुरे, मारोती आत्राम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles