Thursday, February 6, 2025

भारताची विक्री थांबवा, जनतेला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्यूरोचे आवाहन !

नवी दिल्ली : भारताची विक्री थांबवा, असे आवहान मंगळवार दि. २४ ऑगस्ट रोजी भारतातील जनतेला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्यूरोने केले आहे.

हे पण पहा ! १९ विरोधी पक्षांची भारतीय जनतेला हाक ! केले संयुक्त निवेदन सादर

निवेदनात म्हटले आहे की, ‘भारत सरकारने आपण देश विकायला काढला असल्याचे अधिकृतपणे जाहीर केले आहे. वित्तमंत्र्यांनी जाहीर केलेल्या नॅशनल मॉनेटायझेशन पाईपलाईन या धोरणात या राष्ट्रीय संपत्तीची आणि पायाभूत सुविधांची लूट करण्याचा तपशील दिला आहे. हा जनतेच्या मालकीच्या संपत्तीवर घातलेला दरवडा आहे, अशी टिकाही माकपने केली आहे.’

निधनवार्ताआंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाज शास्त्रज्ञ डॉ. गेल ऑम्व्हेट यांचे निधन !

वारसाहक्काने प्राप्त झालेली संपत्ती दैनंदिन खर्च भागवण्यासाठी विकणे शहाणपणाचे नसते. बाजारपेठेत मंदी असताना देशाची मालमत्ता कवडीमोल भावाने विकून फक्त कॉर्पोरेट भांडवलदार दोस्तांचे उखळ पांढरे केले जाणार असून वशिलेबाज भांडवलशाहीच वधारणार आहे, असेही माकपने म्हटले आहे.

हे पण पहा ! हवाईदलाचे मिग 21 कोसळले, वैमानिक जखमी

माकपने पुढे म्हटले आहे की, ‘राष्ट्रीय संपत्तीची लूट करणाऱ्या या निर्णयाला विरोध करून ही लूट थांबविण्यासाठी पुढे यावे.’

Related Articles

- Advertisement -

Latest Articles