Friday, March 29, 2024
Homeजिल्हापौर्णिमा बुचके यांना 'मर्दानी महाराष्ट्राची 2022' राज्यस्तरीय अवॉर्ड

पौर्णिमा बुचके यांना ‘मर्दानी महाराष्ट्राची 2022’ राज्यस्तरीय अवॉर्ड

पुणे : पुणे जिल्ह्यातील पत्रकार कुमारी पौर्णिमा बुचके यांना एस. एस. सिनेव्हिजन (सुप्रसिद्ध चित्रपट निर्माता लेखक दिग्दर्शक सिकंदर सय्यद ) तसेच आझाद फाउंडेशन यांकडून मर्दानी महाराष्ट्राची 2022 राजस्तरीय अवॉर्ड देण्यात आला.

मर्दानी महाराष्ट्राचे 2022 पुरस्कार सोहळा पुणे मधील येरवडा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवनामध्ये अत्यंत उत्कृष्टपणे पार पडला. एस. एस
सिनेव्हिजन व आझाद फाउंडेशन आयोजित मर्दानी महाराष्ट्राचा अवॉर्ड केंद्र सरकार नोंदणीकृत पुरस्कार सामाजिक, प्रशासकीय, शैक्षणिक, क्रीडा, पत्रकारिता, आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या कर्तबगार महिलांच्या कार्याचा गौरव व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

75 व्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील एकूण 75 महिलांना हा पुरस्कार देण्यात आला. जबाबदारी सांभाळून आलेल्या प्रत्येक संकटाला न घाबरता त्याच्याशी ताठ मानेने लढण्याची परंपरा आणि वारसा राष्ट्रमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर व इतर अनेक स्त्रियांच्या रूपाने महाराष्ट्राला लाभलेला आहे. ह्या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, अभिनेत्री, शासकीय अधिकारी, पत्रकारिता क्षेत्रातील देखील उपस्थित होते.

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय