मावळ : मराठी चित्रपट अभिनेते रवींद्र महाजनी (७७) मावळ तालुक्यातील आंबे येथे वास्तव्यास होते. एका बंद फ्लॅटमध्ये शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळला.१९७५ ते १९९० या काळात त्यांनी मराठी चित्रपटसृष्टी गाजवली. ‘झुंज’ ‘आराम हराम आहे’, ‘लक्ष्मी’, ‘लक्ष्मीची पावलं’, ‘देवता’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’, ई गाजलेल्या चित्रपटाचे नायक होते.
मूळचे बेळगावचे असलेले रवींद्र महाजनी मुंबईच्या खालसा महाविद्यालयाचे बी ए पदवीधर होते. देखणे रूप व उत्तम अभिनय शैली यामुळे तरुणाई मध्ये ते गुलाबी हिरो म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजारच्या लोकांनी पोलिसांना कळवले, पोलिसांनी दरवाजा तोडल्या नंतर त्यांचा मृतदेह ताब्यात घेऊन नातेवाईकांना माहिती दिली.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा अभिनेता गश्मीर महाजनी, सून आणि नातू असा परिवार आहे. त्यांनी हिरोची भूमिका चित्रपटही गाजले. महाजनी हे गेल्या काही महिन्यांपासून तळेगाव दाभाडे येथील एका सदनिकेत भाडेतत्वावर राहत होते.
चिखली जाधववाडी येथे येथील धोकादायक उताराचा रस्ता सुरक्षित करा – रोहन चव्हाण
नितेश राणे यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा, तृतीयपंथीचे पुण्यात आंदोलन
जागतिक लोकसंख्यादिनी सुखी जोडप्यांचा सन्मान

