Friday, April 19, 2024
HomeNewsमणिपूर हिंसाचार व्हिडिओ :दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश, आठ जिल्ह्यात कर्फ्यु व...

मणिपूर हिंसाचार व्हिडिओ :दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश, आठ जिल्ह्यात कर्फ्यु व लष्कर तैनात

मणिपूर : मैती जमातीला आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून संतप्त झालेल्या अन्य आदिवासी संघटनांनी सरकारच्या निषेधार्थ पुकारलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे.विविध विद्यार्थी संघटनांनी ऑल ट्रायबल स्टुडंट युनियनअंतर्गत तेथील सगळ्या म्हणजे दहाही जिल्हय़ांत मैती समाजाच्या समावेशाला विरोध म्हणून मोर्चा काढला. संपूर्ण राज्यात हिंसाचार व जाळपोळीच्या घटना घडल्या.


तेथील भाजपच्या आमदारांवर जमावाने हल्ला केला आहे.हवाई दलाच्या विमानाने तातडीने सीआरपीएफ,निमलष्करी दलाच्या तुकड्या दाखल करण्यात आल्या आहेत.इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय