Thursday, January 16, 2025
HomeNewsसोलापूर : विजय नगर ते गोदुताई परुळेकर नगर रस्ता तातडीने करा -...

सोलापूर : विजय नगर ते गोदुताई परुळेकर नगर रस्ता तातडीने करा – युवा महासंघाचीची मागणी

सोलापूर : गोदुताई परुळेकर नगर हे नवीन ग्रामपंचायत स्थापन करून ग्रामपंचायतीच्या निकषाप्रमाणे सर्व स्थानिक व नागरी मुलभूत व पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात यावे. हि मागणी सातत्याने सरकार आणि प्रशासनापुढे संस्थेच्यावतीने करण्यात आली. परंतु वेगवेगळ्या कारणास्तव व तांत्रिक अडचणी दाखवून ग्रामपंचायत स्थापनेचे काम प्रलंबित ठेवले. यामुळे या वसाहतीला शहरातून जोडलेला जो रस्ता आहे तो अत्यंत खराब झालेला आहे. विजय नगर पासून ते गोदुताई नगर क्रांती चौक हा २ कि.मी. चा रस्ता २००६ पासून अद्याप त्याचे पुनःडांबरीकरण किंवा नव्याने रस्ता बनविला गेला नाही. 

त्यामुळे आजमितीस रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे असंख्य अपघात, अपघाती अपंगत्व आणि अपघाती मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले. हा रस्ता म्हणजे गोदुताई वसाहतीचा मुख्य रस्ता होता. पण आता ते मृत्यूच्या दाढेत नेणारा रस्ता होऊ पाहत आहे. याचे गांभीर्य जिल्हा परिषद प्रशासनाने घेणे आवश्यक असताना सुद्धा याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष झाल्याचे आरोप भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाचे जिल्हा सचिव अनिल वासम यांनी केले. जर हा रस्ता तातडीने नाही झाला तर महासंघाच्या वतीने उग्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

हे वाचा ! दलित साहित्याची कोंडी आदिवासी साहित्य प्रवाहाने फोडली – डॉ. श्रीपाल सबनीस

सोमवार दि. १३ सप्टेंबर २०२१ रोजी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ तालुका समितीच्या वतीने गोदुताई परुळेकर नगरला जोडणारा मुख्य रस्ता विजय नगर पासून ते गोदुताई नगर क्रांती चौक हा २ कि.मी. तातडीने जिल्हा प्रशासनाच्या मार्फत नवीन रस्ता बनवावे. हि प्रमुख मागणी घेऊन युवा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली राज्य उपाध्यक्ष अशोक बल्ला, जिल्हा सचिव अनिल वासम, तालुका सचिव विजय हरसुरे, जिल्हा कोषाध्यक्ष बाळासाहेब मल्याळ, मधुकर चिल्लाळ, मल्लेशम कारमपुरी, शामसुंदर आडम आदींच्या शिष्टमंडळाने निवेदन देऊन सदर विषयी चर्चा करण्यात आली.

ब्रेकींग : माध्यमातील वृत्तानंतर बार्टीला ९१.५० कोटींचा निधी तातडीने वितरित

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी येत्या २० सप्टेंबर ला होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीमध्ये सदर प्रस्ताव मंजुरीस ठेवून पुढील कार्यवाही करण्याचे सकारात्मक आश्वासन दिले.

हे वाचा ! मराठी विद्यार्थ्यांनी युरोप अमेरिकेत केला गणेशउत्सव साजरा


संबंधित लेख

लोकप्रिय