Wednesday, February 5, 2025

देशव्यापी कामगार संप जिल्ह्यात जोरदार यशस्वी करा – कॉम्रेड अण्णा सावंत

बांधकाम कामगार संघटनेच्या सर्वसाधारण सभेत केले कामगारांना आवाहन..!

जालना : आज दि. 28 फेब्रुवारी 2022 रोजी जालना जिल्हा बांधकाम कामगार संघटना (सिटू) ची वार्षिक सर्वसाधारण सभा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड गोविंद आर्द्ड यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली.

या सभेस सिटू चे राज्य सचिव कॉम्रेड अण्णा सावंत यांनी मार्गदर्शन करून कामगार व जन विरोधी धोरणे राबवणाऱ्या मोदी सरकारच्या विरोधात 28 व 29 मार्च रोजीचा देशव्यापी संप जिल्ह्यातील सर्व तालुक्यात जोरदार यशस्वी करावा असे आवाहन यावेळी त्यांनी बांधकाम कामगारांना केले.

भारतातील विद्यार्थी रशिया आणि युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी का जातात? वाचा सविस्तर !

यावेळी मागील वर्षाचा कार्य अहवाल जन सेक्रेटरी कॉम्रेड दीपक शेळके यांनी सर्वांसमोर मांडला तर जमा खर्च अहवाल कोषाध्यक्ष सुभाष मोहिते यांनी मांडला. त्यास सर्वानी टाळ्यांच्या गजरात एकमताने मंजुरी दिली.

पुढील वर्षासाठी 15 जणांची नवीन कार्यकारणी एकमताने निवडण्यात आली. यामध्ये अध्यक्ष गोविंद आर्दड, जनरल सेक्रेटरी म्हणून दीपक शेळके तर कोषाध्यक्ष म्हणून सुभाष मोहिते पुन्हा एकमताने निवड करण्यात आली.

पुढील काळात गाव, मोहल्ला, वस्ती पातळीवर संघटना संघटना विस्तार करावा, सभासद संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यासाठी कामाच्या ठिकाणी जाऊन बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदनी पासून वंचित असलेल्या कामगारांना नोंदीत करण्यासाठी कामगार शोध मोहीम राबवावी, मंडळाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी सातत्याने लेबर ऑफिसकडे पाठपुरावा केला पाहिजे, इतर भतृभावी कामगार संघटनासोबत समनव्य ठेऊन जिल्ह्यत सिटू मजबूत केली पाहिजे, 28 – 29 मार्च च्या संपानिमित्त प्रत्येक तहसील कार्यालयावर तीव्र आंदोलन करून मोदी सरकारच्या कामगार व जनविरोधी धोरणाला विरोध केला पाहिजे, नवीन कमिटीने नव्या जोमाने कामाला लागावे, असे यावेळी अध्यक्षीय समारोपात बोलताना गोविंद आर्दड यांनी आवाहन केले.

दहावी, बारावी पास विद्यार्थ्यासाठी नोकरीची चांगली संधी : IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड मध्ये 1095 जागांची भरती !

या वेळी गाजनन पातरफळे, कल्पना आर्द्ड, अजित पंडित, अंशीराम गणगे, प्रभाकर चोरमारे, दिगंबर वाघूनडे, कुलदीप आर्दड, द्रौपदी पाईकराव, सुधाकर कोथलकर, विजय बोर्डे, विजय देशमुख, बालासाहेब राऊत, यशोदा राऊत, शरद डुकरे, शिवाजी फोलाने आदींसह मोठ्या संख्येने उपस्तिथी होती.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles