सातारा : उद्यापासून महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्तक बेमुदत संपावर जाणार आहेत, संप यशस्वी करा, असे आवहान महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्या राज्य अध्यक्षा आनंदी अवघडे यांनी “महाराष्ट्र जनभूमी” शी बोलताना सांगितले.
अवघडे म्हणाल्या, सर्व जिल्ह्यात १०० टक्के काम बंद ठेवून संप यशस्वी केला जाणार आहे. कोरोना परिस्थिती रस्त्यावर उतरून आंदोलन करणे शक्य नाही, ज्या ठिकाणी शक्य असेल त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच आशा व बीएफ पीएचसी गेटच्या आता बसुन किमान 3 ते 4 तास धरणे आंदोलन करणार आहेत.