Monday, December 9, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडMahesh Landge : सिरवी क्षत्रिय समाज आमदार महेश लांडगे यांच्या पाठीशी :...

Mahesh Landge : सिरवी क्षत्रिय समाज आमदार महेश लांडगे यांच्या पाठीशी : आमदार केसाराम चौधरी

भाजपाच्या ध्येय धोरणांमुळे सर्वसामान्य पाठीशी (Mahesh Landge)

विधानसभा निवडणुकीत राष्ट्र प्रथम भूमिका

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : कामानिमित्ताने शहरभर विखुरलेल्या सिरवी समाजाच्या पाठीशी आमदार महेश लांडगे नेहमीच खंबीरपणे उभे आहेत. आरोग्य, शिक्षण ,व्यवसाय अशा कोणत्याही प्रश्नात समाजाच्या बाजूने आमदार महेश लांडगे उभे असतात त्यामुळे सिरवी क्षत्रिय समाज युवा मंच द्वारा त्यांना पाठिंबा घोषित केल्याचे मारवाड राजस्थानचे आमदार केसाराम चौधरी यांनी सांगितले. (Mahesh Landge)

निगडी येथील आई माता मंदिरामध्ये झालेल्या बैठकीत आमदार महेश लांडगे यांना सिरवी क्षत्रिय समाज युवा मंच द्वारा पाठिंबा घोषित करण्यात आला. यावेळी अध्यक्ष प्रकाश चौधरी, उपाध्यक्ष पुरण पवार, उमेश चौधरी, ठाणाराम चौधरी, रमेश चौधरी, मदन चौधरी आदी उपस्थित होते.


केसाराम चौधरी म्हणाले की, आमदार महेश लांडगे यांच्याशी नेहमीच अनेक विषयासंदर्भात चर्चा होत असते त्यावेळी शहरात विखुरलेल्या समाजाच्या प्रत्येक प्रश्न संदर्भात ते आत्मीयतेने बोलतात. समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचा नेहमीच पुढाकार असतो. मुख्य म्हणजे भाजपच्या ध्येय धोरणांनुसार काम करणे ही त्यांची हातोटी आहे. सिरवी समाज भाजपशी एकनिष्ठ आहे. त्यामुळे आमदार महेश लांडगे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याचा निर्धार सुर्वे क्षत्रिय समाज युवा मंचर वारा घेण्यात आला आहे असे देखील केसाराम चौधरी यांनी सांगितले. (Mahesh Landge)

प्रतिक्रिया :

सिरवी क्षत्रिय समाज युवा मंच यांनी पाठिंबा जाहीर केला याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मी मानतो. भाजपाशी एकनिष्ठ राहणे हे या समाजाचे वैशिष्ट्य आहे. व्यवसाय उद्योगांच्या निमित्ताने हा समाज पिंपरी चिंचवड शहरांमध्ये दुधात साखर मिसळावी अशा पद्धतीने काम करत आहे. या सर्व समाज घटकांमधूनच पिंपरी-चिंचवड शहर परिपूर्ण होत आहे. या समाजाच्या अडचणी सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध आहे.

महेश लांडगे, आमदार भोसरी विधानसभा, उमेदवार महायुती.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मॅरेथॉन दौडद्वारे केली मतदार जनजागृती; जिल्हाधिकाऱ्यांचा सहभाग

सोन्याच्या दरात घसरण, चांदीही स्वस्त; जाणून घ्या सध्याचे भाव

रोहित शर्मा दुसऱ्यांदा झाला बाबा ; पत्नी रितिकाने मुलाला दिला जन्म

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का

दिशा सालियन प्रकरण पुन्हा तपासणार, रामदास कदम यांचा आदित्य ठाकरेंना इशारा

या कारणामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना सलग चार दिवस सुट्टी

मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध, ‘आम्ही हे करू’च्या घोषणांवर राज ठाकरेंचा भर

चंद्रकांत पाटलांच्या प्रयत्नांना यश ; बाणेर-बालेवाडी पाणी प्रश्न मार्गी

भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन

भरधाव क्रुझर पुलाच्या कठड्याला धडकली, चालकाचा मृत्यू ; ७ जखमी

मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य

संबंधित लेख

लोकप्रिय