पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : दि.१६ : आमदार महेश लांडगे यांनी संपूर्ण भोसरी मतदारसंघाचा विकास डोळ्यासमोर ठेवून काम केले. त्यांच्यामुळे कृष्णा नगर, पूर्णा नगर भागात आंतरराष्ट्रीय दर्जाचे अटलबिहारी वाजपेयी उद्यान, दीनदयाळ उपाध्याय क्रीडांगण, भुयारी मार्ग, घरकुल साठी मल्टीपर्पज टाऊन हॉल असे अनेक चांगले प्रकल्प साकारले असे प्रतिपादन माजी नगरसेविका योगिता नागरगोजे यांनी केले. (Mahesh Landge)
नागरगोजे म्हणाले की, पूर्वी पूर्णा नगर येथील खाणीत घाणीचे साम्राज्य होते. डुकरांचा सुळसुळाट होता. पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे अटल बिहारी वाजपेयी उद्यान साकारण्यात आले. आज देशभरातून हे उद्यान पाहण्यासाठी लोक येत आहेत. या भागात खेळाला मैदान नाही हे लक्षात घेऊन दीनदयाळ उपाध्याय क्रीडांगण उभारण्यात आले तेथे स्केटिंग, क्रिकेट, कबड्डी, टेनिस अशा स्पर्धा होतात.
शरद नगर, कोयना नगर, स्पाईन रोडच्या लोकांचा प्रश्न लक्षात घेऊन तिथे भुयारी मार्ग उभारण्यात आला. घरकुल मध्ये सर्वसामान्य कामगार वर्ग आहे त्याच्यासाठी छोटे मोठे कार्यक्रम करण्यासाठी मल्टीपर्पज टाऊन हॉल उभारण्यात आला. स्पर्धा परीक्षेसाठी ग्रंथालय उभारण्यात आले.
घरकुल मध्ये सुसज्ज भाजी मंडई तसेच सर्वसामान्य लोकांना वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी महापालिकेचे रुग्णालय सुरू करण्यात आले. घरकुलला सीमा भिंत बांधण्यात आली असे नागरगोजे यांनी सांगितले. (Mahesh Landge)
पूर्णा नगर येथील रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट होती. मात्र आज तेथे सिमेंटचे रस्ते करण्यात आले आहेत. वीज वितरण च्या डीपी बसविण्यात आले आहेत बहुउद्देशीय हॉल उभारण्यात आला आहे असे त्यांनी सांगितले.
आमदार महेश लांडगे यांनी संपूर्ण भोसरी मतदार संघाच्या विकासासाठी खूप मोठे काम केले आहे. मोशी येथे उभारण्यात आलेला वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, वारकरी संप्रदायाची परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी उभारण्यात आलेले संतपिठ, देशातील पहिले संविधान भवन, पिंपरी चिंचवड साठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय, शहरातील नागरिकांची पाण्याची गरज भागावी यासाठी भामा आसखेड, आंध्रा प्रकल्पातून जादा पाणी आणण्यासाठीचा प्रकल्प अनेक उदाहरणे नागरगोजे यांनी दिली.
चऱ्होली, मोशी भागाचा मोठ्या प्रमाणात विकास करण्यात आल्याने आज लोक त्या भागात सदनिका घेण्यास प्राधान्य देत आहेत. एकूणच विकासाच्या दृष्टीने आमदार महेश लांडगे यांनी केलेले काम अनेक वर्षे लक्षात राहील असे आहे. त्यामुळेच यावेळी आमदार महेश दादा लांडगे हे एक लाखाहून अधिक मताने विजयी होतील असा विश्वास योगिता नागरगोजे यांनी व्यक्त केला.
हेही वाचा :
मॅरेथॉन दौडद्वारे केली मतदार जनजागृती; जिल्हाधिकाऱ्यांचा सहभाग
सोन्याच्या दरात घसरण, चांदीही स्वस्त; जाणून घ्या सध्याचे भाव
रोहित शर्मा दुसऱ्यांदा झाला बाबा ; पत्नी रितिकाने मुलाला दिला जन्म
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का
दिशा सालियन प्रकरण पुन्हा तपासणार, रामदास कदम यांचा आदित्य ठाकरेंना इशारा
या कारणामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना सलग चार दिवस सुट्टी
मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध, ‘आम्ही हे करू’च्या घोषणांवर राज ठाकरेंचा भर
चंद्रकांत पाटलांच्या प्रयत्नांना यश ; बाणेर-बालेवाडी पाणी प्रश्न मार्गी
भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
भरधाव क्रुझर पुलाच्या कठड्याला धडकली, चालकाचा मृत्यू ; ७ जखमी
मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य