Friday, December 6, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडMahesh Landge : महेश लांडगे यांच्या प्रयत्नातून मोशी राहण्यायोग्य उपनगर बनले -...

Mahesh Landge : महेश लांडगे यांच्या प्रयत्नातून मोशी राहण्यायोग्य उपनगर बनले – सारिका बो-हाडे यांचे प्रतिपादन

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : दि. १७ : पुण्यात ज्या ज्या सुविधांचे केंद्रीकरण झाले होते त्या सुविधा मोशी भागात देण्याचा निर्धार आमदार महेश लांडगे यांनी केला आणि बहुतांशी पूर्ण केला आहे. मोशी कचरा डेपोमुळे या भागात प्रचंड दुर्गंधीचा त्रास होत होता. (Mahesh Landge)

आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नातून वेस्ट टू एनर्जी प्रकल्प साकार झाला. त्यामुळे ही समस्या दूर झाली. स्टेटस ऑफ लिविंग वाढले. एकेकाळी नकोशी वाटणारी मोशी आता सर्वांना हवीहवीशी वाटू लागली असल्याचे प्रतिपादन माजी नगरसेविका सारिका बो-हाडे यांनी येथे केले.

बो-हाडे म्हणाल्या की, मोशी कचरा डेपोच्या दुर्गंधीमुळे मोशी एकेकाळी नकोशी वाटायची मात्र महेशदादा यांच्या प्रयत्नातून वेस्ट टू एनर्जी प्रकल्प साकार झाला. त्यामुळे ही समस्या दूर झाली. पुण्यात ज्या सुविधांचे केंद्रीकरण झाले होते त्या सुविधा मोशी मध्ये आणण्याचा प्रयत्न महेशदादा लांडगे यांनी केला.

सीओइपी इंजीनियरिंग कॉलेज मोशी भागात होत आहे. मोशी मध्येच साडेआठशे बेड्सचे रुग्णालय होत आहे. या भागात महापालिकेची माध्यमिक शाळा सुरू झाली आहे. शासकीय मेडिकल कॉलेज सुरू होत आहे. आयटी हब येत आहे. समाविष्ट गावांमध्ये रस्ते, पाणी आदी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन भामा आसखेड, आंद्रा मधून जादा पाणी आणण्यात आले आहे. एकूणच लोकांना ज्या ज्या मूलभूत सुविधा हव्यात त्या त्या प्रयत्नपूर्वक उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. एकेकाळी नको नकोशी वाटणारी मोशी त्यामुळेच आज हवीशी वाटू लागली आहे.आमच्या भागात ९९ टक्के कामे झाली आहेत. (Mahesh Landge)

भरपूर सुविधाही झाल्या आहेत. त्यामुळे राहण्यायोग्य उपनगर म्हणून लोक मोशी भागाला प्राधान्य देऊ लागले आहेत. हे आमदार महेशदादा लांडगे यांच्या प्रयत्नांचे यश आहे. शंभर टक्के कामे व्हावी त्यासाठी मतदारांनी पुन्हा एकदा आमदार महेशदादा लांडगे यांना विजयी करावे असे आवाहन सारिका बोऱ्हाडे यांनी केले.

आमदार महेश लांडगे यांनी संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरासाठी मोठे योगदान दिले आहे. शास्ती कर माफीसाठी त्यांनी पाठपुरावा करून विषय मार्गी लावला. पिंपरी चिंचवड साठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय आणले याचा उल्लेखही बोऱ्हाडे यांनी केला. कामांच्या बळावर आमदार लांडगे हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास सारिका बोऱ्हाडे यांनी व्यक्त केला.

संबंधित लेख

लोकप्रिय