Wednesday, February 5, 2025

बिरसा फायटर्समध्ये महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध बाॅडी बिल्डर

रत्नागिरी : शरीरसौष्ठव स्पर्धेत 40 पेक्षा अधिक पदके व प्रमाणपत्रे मिळवणारा राहूरी येथील सखाहरी शांताराम बर्डे या बाॅडी बिल्डर ने बिरसा फायटर्स संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आता बिरसा फायटर्स मध्ये वकील, आर्मी नंतर बाॅडी बिल्डर सुद्धा काम करण्यासाठी येत असल्यामुळे बिरसा फायटर्स टिम व संघटना अधिकच मजबूत होत आहे.

सखाहरी शांताराम बर्डे या आदिवासी तरूणाने शरीरसौष्ठव स्पर्धेत 40 पेक्षा अधिक पदके व प्रमाणपत्रे मिळवली आहेत. त्याचबरोबर कला शाखेत उच्च शिक्षण घेतले आहे. सखाहरी बर्डे हा एक मेहनती, होतकरू तरूण पहेलवान आहे. गरीब परिस्थितीवर मात करत त्याचा जीवनात संघर्ष सुरू आहे. बिरसा फायटर्स टिमचे काम आवडल्यामुळे त्यांनी बिरसा फायटर्स मध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे. 

सखाहरी बर्डे यांना योग्य असे सन्मान जनक पद देऊन आम्ही त्यांना आपल्या टिममध्ये घेणार आहोत व कार्यक्रमात त्यांचे जंगी स्वागत करणार आहोत. सखाहरी बर्डे यांच्या बद्दल आमच्या बिरसा फायटर्स संघटनेच्या पदाधिकारी यांना आपण माहिती दिली आहे. सर्व पदाधिकारी यांनी सखाहरी शांताराम बर्डे यांना आपल्या बिरसा फायटर्स मध्ये घेण्यास होकार दिला असून वाटसपवर ग्रूपवर स्वागत करायला सुद्धा सुरवात केली आहे. अशी माहिती बिरसा फायटर्सचे संस्थापक  राष्ट्रीय अध्यक्ष  सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles