Maha TAIT Exam 2023 : स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये ‘पवित्र’ या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ (टीईटी) [Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test (TAIT) – 2022] परीक्षेसाठी प्रक्रिया सुरू झाली आहे.
ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या परीक्षेसाठी ३१ जानेवारी ते ८ फेब्रुवारीदरम्यान ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली असून, ही परीक्षा २२ फेब्रुवारी ते ३ मार्चदरम्यान आयोजित केली जाणार आहे.
परीक्षेचे माध्यम मराठी, इंग्रजी, उर्दू असेल. ही परीक्षा २०० गुणांची असणार आहे. अभियोग्यतेत १२० प्रश्न १२० गुणांसाठी असतील. बुद्धिमत्ता घटकात ८० गुणांसाठी ८० प्रश्न असणार असून, २०० गुणांसाठी १२० मिनिटांचा वेळ असणार आहे. परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या उमेदवारांची प्रवेशपत्रे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर १५ फेब्रुवारीपासून उपलब्ध होतील. परीक्षेत प्रविष्ट होण्यासाठी अडचणी असल्यास परीक्षा परिषदेने ई-मेल संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’