Saturday, March 15, 2025

राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ६ लाख ५७ हजाराच्या घरात

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

मुंबई  : राज्यात आज ११ हजार ७४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.६२ टक्के एवढे आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ४ लाख ७० हजार ८७३ रुग्ण बरे झाले आहेत. आज १४ हजार १६१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ६४ हजार ५६२ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३४ लाख ९२ हजार ९६६ नमुन्यांपैकी ६ लाख ५७ हजार ४५० नमुने पॉझिटिव्ह (१८.८२ टक्के) आले आहेत. राज्यात ११ लाख ९२ हजार ६८५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३५ हजार १३२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३३९ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३० टक्के एवढा आहे.

आता पर्यंत राज्यात एकूण ६ लाख ५७ हजार ४५० इतके लोक कोरोना बाधित झाले होते, त्यातील ४ लाख ७० हजार ८७३ रुग्ण बरे झालेले आहेत तर २१ हजार ६९८ लोकांचा कोरोनाने मृत्यू झालेला आहे तसेच इतर कारणांमुळे ३१७ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles