Friday, April 11, 2025
---Advertisement---
---Advertisement---

ब्रेकिंग : महाराष्ट्र हादरला! हत्येनंतर मृतदेहाचे केले तुकडे; नंतर कुकरमध्ये उकळले

Crime News : महाराष्ट्राला हादरवणारी आणि संतापजनक घटना मुंबईमधील मीरा रोड परिसरातील नया नगर येथे घडली आहे. हत्येनंतर मृतदेहाचे केले तुकडे; नंतर कुकरमध्ये उकळले असल्याची संतापजनक घटना घडली असून लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या तरुणीची तिच्याच साथीदाराने हत्या केली. मुंबई पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.

सविस्तर वृत्त असे की, या घटनेतील मृत तरुणीचं वय 32 वर्ष असून ती मागील काही काळापासून मनोज नावाच्या ५५ वर्षीय व्यक्तीसोबत मीरा रोड येथील गीता नगरच्या सातव्या मजल्यावर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. बुधवारी तिच्या घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली.

हा खून २-३ दिवसापूर्वी झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीच्या शेजारी राहणाऱ्या लोकांना फ्लॅटमधून प्रचंड वास येत होता, त्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाचे तुकडे ताब्यात घेऊन आरोपीला अटक केली.

पोलिसांचे म्हणणे आहे की, मनोज आणि सरस्वतीचे कुणावरून तरी भांडण झाले होते. रागाच्या भरात मनोजने त्याच्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या केली. यानंतर त्यांने बाजारात जाऊन झाड कापण्याचे यंत्र आणले. पुन्हा फ्लॅटवर आल्यानंतर मृतदेहाचे अनेक तुकडे करण्यात आले. त्याने मृतदेहाचे अनेक तुकडे प्रेशर कुकरमध्ये उकळल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुरावे नष्ट करण्यासाठी आणि दुर्गंधी दूर करण्यासाठी त्याने हे कृत्य केले असावे.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles