मुंबई (वर्षा चव्हाण) : दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत सहभागी झालेल्या महाराष्ट्रासाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये ५४ सामंजस्य करार केले आहेत, रिलायन्स इंडस्ट्रीजसोबत केलेला करार ३ लाख कोटी रुपयांचा असून त्यामुळे ३ लाख नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे. या करारांवर गेल्या दोन दिवसांत स्वाक्षरी करण्यात आली, अशी माहिती राज्य सरकारने बुधवारी दिली. (Maharashtra govt)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने दावोस येथे दोन दिवसांत १५.७० लाख कोटी रुपयांच्या ५४ सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली आहे. या करारामुळे कंपन्यांकडून मोठी गुंतवणूक होईल. हे करार विविध क्षेत्रांमध्ये ३,४५,००० पेक्षा जास्त रोजगार निर्माण करतील, ज्यामध्ये पेट्रोकेमिकल्स, कापड उद्योग, पायाभूत सुविधा, इलेक्ट्रॉनिक्स आणि ग्रीन एनर्जी यांचा समावेश आहे.
Maharashtra govt : मुख्यमंत्री कार्यालयाने X (पूर्वीचे ट्विटर) वर माहिती दिली आहे
# अशी असेल स्थाननिहाय गुंतवणूक :
▪️एमएमआर : 3,05,000 कोटी
▪️विदर्भ : 50,319 कोटी
▪️मराठवाडा किंवा उत्तर महाराष्ट्र : 25,000 कोटी
▪️नागपूर : 58,299 कोटी
▪️पुणे : 51,600 कोटी
▪️अहिल्यानगर : 12,740 कोटी
# गुंतवणूक करणारे प्रमुख उद्योग कोणते?
▪️रिलायन्स इंडस्ट्रीज
▪️ग्रीन एनर्जी
▪️टाटा समूह
▪️नेल्सन मिडिया प्रा. लि.
▪️इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्हज लि.
▪️हिरानंदानी समूह
▪️एव्हरस्टोन समूह
▪️ओपन ओरिजिन इंडिया
हे ही वाचा :
थायलंडमध्ये समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता, आशियामधील ठरला तिसरा देश
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ; वृद्ध महिलेचा मृत्यू, सहा जण जखमी
पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा इंग्लंडवर 7 विकेट्सने दणदणीत विजय
मोठी बातमी : कपिल शर्मासह ‘या’ बॉलीवूड कलाकारांना जीवे मारण्याची धमकी, बॉलीवूडमध्ये खळबळ
‘बर्ड फ्लू’मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई
स्टाफ रूममधील शिक्षक-शिक्षिकेचा अश्लील व्हिडिओ व्हायरल, संबंधित शिक्षक निलंबित