Saturday, March 15, 2025

महाराष्ट्रातील १० पोलीस अधिकाऱ्यांना गृहमंत्रालयाचे विशेष पोलीस पदक

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now
Maharashtra 10 Police Officers' Home Minister's Special Police Medal

नवी दिल्ली : उत्कृष्ट तपास कार्य करणाऱ्या देशातील १२१ पोलीस अधिकारी – कर्मचाऱ्यांना आज केंद्रीय गृहमंत्रालयाचे विशेष पोलीस पदक जाहीर झाले असून यात महाराष्ट्रातील १० पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

उत्तम तपास कार्य करणाऱ्या पोलिसांच्या कार्याची दखल घेत केंद्रीय गृहमंत्रालयाने आज वर्ष २०२० साठीच्या विशेष पोलीस पदकांची घोषणा केली. पोलिसांमध्ये तपास कार्याबद्दल उच्च व्यावसायिक दृष्टीकोण निर्माण व्हावा व उत्तम तपास कार्याची दखल म्हणून २०१८ पासून सुरु झालेल्या या पुरस्कारासाठी यावर्षी महाराष्ट्रातील १० पोलीस अधिकाऱ्यांची निवड झाली आहे.

महाराष्ट्रातील या अधिकाऱ्यांना विशेष पोलीस पदक

◾️शिवाजी पंडीतराव पवार, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा, पुणे शहर )

◾️राजेंद्र सिदराम बोकडे, पोलीस निरीक्षक

◾️उत्तम दत्तात्रेय सोनवणे, पोलीस निरीक्षक

◾️ नरेंद्र कृष्णराव हिवरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक

◾️ ज्योती लक्ष्मण क्षिरसागर, पोलीस अधीक्षक

◾️ अनिल तुकाराम घेरडीकर, उप विभागीय पोलीस अधिकारी

◾️ नारायण देवदास शिरगावकर, उप पोलीस अधीक्षक (उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती)

◾️ समीर नाजीर शेख, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा,नाशिक शहर)

◾️ किसन भगवान गवळी, सहायक पोलीस आयुक्त

◾️ कोंडीराम रघु पोपेरे , पोलीस निरीक्षक

विशेष पोलीस पदकासाठी देशातील १२१ पोलीस अधिकारी – कर्मचाऱ्यांची नावे जाहीर झाली असून यात केंद्रीय गुन्हे अन्वेषन विभागाचे १५, महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील प्रत्येकी १०, उत्तर प्रदेशातील ८, केरळ आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी ७ अधिकारी कर्मचाऱ्यांसह उर्वरित अन्य राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. विशेष पोलीस पदक जाहीर झालेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये एकूण २१ महिलांचा समावेश आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles