इजिप्त ची राजधानी असलेल्या कैरो मध्ये सुरू असलेल्या विश्व कपामध्ये भारतीय महिला नेमबाजी गटाने जबरदस्त खेळांचे प्रदर्शन करून विजयश्री खेचून आणली आहे. रविवारी झालेल्या स्पर्धेत राही सरनोबत, ईशा सिंग आणि रिदम सांगवान या महिलांच्या संघाने 25 मीटर पिस्टल टीमच्या गटामध्ये सुवर्णपदक पटकावले आहे.
याआधी दहा मीटर एयर पिस्टल टीम मध्ये सुद्धा भारताने सुवर्णपदकाला गवसणी घातली होती .यामध्ये ईशा आणि रुचिता यांचा समावेश होता .जर्मनीला हरवून त्यांनी हा विजय प्राप्त केला होता.
ईशा सिंग हिने आत्तापर्यंत तीन पदके जिंकली आहेत. रविवारी तिने दुसरे सुवर्णपदक जिंकले तत्पूर्वी एका रौप्य पदाला तिने गवसणी घातली होती .एकूण मिळालेल्या पदकांच्या यादी मध्ये भारतीय संघ पाच पदकांसह दुसऱ्या स्थानी आहे.