आळंदी / अर्जुन मेदनकर : आळंदी पुणे रस्त्यावरील वडमुखवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात ट्रस्टच्या वतीने ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर, सुनीता तापकीर, ॲड. मयूर तापकीर, कीर्ती तापकीर यांचे सह तापकीर परिवाराच्या वतीने प्रथा परंपरांचे पालन करीत श्री पांडुरंगाची महापूजा करण्यात आली.
यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी माता आणि माऊलींचे मूर्तीची महापूजा अभिषेक हरिनाम गजरात करण्यात आला. आषाढी एकादशी निमित्त श्रींचे मंदिरात प्रथा परंपरांचे पालन करीत दही, दूध, मधाचा, सुगंधित अभिषेक करण्यात आला. श्री पांडुरंग, श्री रुक्मिणी माता आणि माऊलींचे वैभवी मूर्तीची महापूजा उत्साहात करण्यात आली. यावेळी हिरामण बर्डे, रामनंदा बुर्डे, मंगेश गराडे, पूजा गराडे, ह.भ.प. रमेश घोंगडे, राजेंद्र नाणेकर, हर्षल अरबट, शिवाजी तळेकर आदीसह माऊली भक्त भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली. या निमित्त परिसरातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनास उपस्थित होते. महापूजा नंतर श्रींना महाप्रसाद नैवेद्य वाढविण्यात आला. भाविकांना आषाढी एकादशी निमित् महा प्रसादाचे वाटप करण्यात आले. सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत हरिभक्त परायण व्यंकटेश महाराज बिराजदार यांची सुश्राव्य कीर्तन सेवा झाली. मंदिरात एकादशी निमित्त आकर्षक पुष्प सजावट व रांगोळी लक्षवेधी रेखाटण्यात आली होती.
‘ट्रॅक कंपोनन्ट्स’च्या कामगारांना तब्बल साडेबारा हजारांची वेतनवाढ !
ज्येष्ठ नागरिक त्रिवेणीनगर संघाचा 14 वा वर्धापन दिन संपन्न
संभाजी ब्रिगेडच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन