Wednesday, February 12, 2025

नवीन वर्षाच्या सुरुवातीला पुण्यात निघणार महामोर्चा कारण..

पुणे : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली आहे. महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय स्मारकाची उभारणी करण्याची मागणी होत आहे.आता फुले दाम्पत्याच्या सन्मानार्थ एक जानेवारी रोजी महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1848 मध्ये मुलींची पहिली शाळा पुणे येथील भिडेवाड्यात सुरू केली. त्यामुळे भिडेवाडा येथे महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय स्मारकाची उभारणी करण्यात यावी, अशी मागणी सात वर्षांपासून माळी महासंघ करीत आहे.

फुले दाम्पत्याच्या सन्मानार्थ पुण्यात रविवारी एक जानेवारी 2023 रोजी माळी महासंघाच्या नेतृत्वाखाली भिडेवाडा ते फुलेवाडा अशा फुले दाम्पत्य सन्मान दिन महारॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. यावेळी माळी महासंघाचे राष्ट्रीय महासचिव रवींद्र अंबाडकर, राष्ट्रीय कोषाध्यक्ष प्रा. नानासाहेब कांडलकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष काळुराम गायकवाड,राष्ट्रीय महिला अध्यक्षा वनिता लोंढे, महिला प्रदेशाध्यक्षा शुभांगी लोंढे, राष्ट्रीय सचिव कैलास महाजन, भारत माळी, सहसचिव संतोष जमदाडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत. यावेळी सकल माळी समाजाने महारॅलीत उपस्थित राहावे, असे आवाहन पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष गोपाळ पंढरीनाथ भुजबळ यांनी माळी बांधवाना केले आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles