Wednesday, February 19, 2025

महाकुंभासाठी निघालेल्या भाविकांचा गाडीचा भीषण अपघात, 10 जणांचा मृत्यू, 19 जखमी

Prayagraj accident : प्रयागराज-मिर्झापूर महामार्गावर (Prayagraj-Mirzapur Highway) झालेल्या भीषण अपघातात 10 भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर 19 जण जखमी झाले. भाविकांनी भरलेली बोलेरो आणि बसची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने हा भीषण अपघात झाला.

महाकुंभासाठी निघालेल्या भाविकांचा मृत्यू

ही दुर्घटना महाकुंभ २०२५ (Mahakumbh 2025) मध्ये संगम स्नानासाठी येणाऱ्या भाविकांच्या गटासोबत घडली. मृत भाविक छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यातील रहिवासी होते. अपघातात बोलेरोमधील सर्व १० जणांचा जागीच मृत्यू झाला.

बसमधील प्रवासीही जखमी (Prayagraj accident)

या अपघातावेळी संगममध्ये स्नान करून वाराणसीकडे जाणाऱ्या बसमध्ये प्रवास करणारे १९ भाविकही जखमी झाले. हे भाविक मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील रहिवासी आहेत. सर्व जखमींना सीएचसी रामनगर (CHC Ramnagar) रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी मृतांच्या खिशात आढळलेल्या आधार कार्ड आणि मोबाईल नंबरच्या आधारे त्यांच्या ओळखीची खात्री केली. तसेच, मृतदेह शवागारात पाठवून कुटुंबीयांना दुर्दैवी घटनेची माहिती देण्यात आली आहे.

महाकुंभमध्ये याआधीही मोठ्या प्रमाणात गर्दीमुळे चेंगराचेंगरीच्या घटनांमध्ये अनेक भाविकांचा मृत्यू झाला होता. या अपघाताने महाकुंभातील सुरक्षेच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्या आणि दुचाकीस्वाराची जोरदार धडक, पुढे काय झाले पहा !

प्रेमात अडथळा ठरत असल्याने आईसमोर ५ वर्षांच्या चिमुरड्याचा खून, मृतदेह फेकला नदीत

CIBIL स्कोअरमुळे मोडलं लग्न ; आर्थिक इतिहास पाहुन वधूपक्षाला धक्का !

अंगणवाडीत विविध पदांसाठी भरती ; मंत्री आदिती तटकरे यांनी दिली महत्वाची माहिती

Related Articles

- Advertisement -

Latest Articles