चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक – राष्ट्रवादीचे नाना काटे यांना उमेदवारी जाहीर
पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाना काटे हे उमेदवार असतील. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र काम करून या निवडणुकीत आम्ही नक्कीच विजयी होऊ, असा आम्हाला विश्वास आहे, असे ट्विट करून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाना काटे यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
विठ्ठल उर्फ नाना काटे शहरातील तरुण नेतृत्व आहे. 2014 मध्ये त्यांनी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात मोठे मताधिक्य घेतले होते. पिंपरी चिंचवड मनपातील विरोधी पक्ष नेते व लढाऊ परखड नेते अशी त्यांची ख्याती आहे. चिंचवड विधानसभा मतदार संघात आता ‘काटे’की टक्कर होणार आहे.
