Thursday, July 18, 2024
Homeक्रीडाविश्वलखनऊ सुपरजायंट्सच्या "या" सदस्याचा कार अपघात

लखनऊ सुपरजायंट्सच्या “या” सदस्याचा कार अपघात

मुंबई : आयपीएलमधील नवी फ्रँचायझी लखनऊ सुपरजायंट्सचे सीईओ रघु अय्यर यांच्या कारचा अपघात झाला आहे. लखनऊ विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्यापूर्वी हा अपघात झाला.

लखनौ सुपर जायंट्सचे सीईओ रघु अय्यर यांसह एकूण 3 जण शुक्रवारी (२९ एप्रिल) पुण्याच्या गहुंजे स्टेडियमला जात असताना रस्त्यात त्यांचा अपघात झाला आहे. या अपघातावेळी कारमध्ये लखनऊ संघाचे मार्गदर्शक गौतम गंभीरचा मॅनेजर गौरव अरोरा आणि रचिता बेरी हेही होते. सुदैवाने या अपघातात सीईओ अय्यर यांच्यासह गौरव आणि रचिता हे तिघेही पूर्णपणे सुरक्षित आहेत. लखनऊ संघाने याबद्दल माहिती दिली आहे.

ब्रेकिंग : बॉलिवूडच्या “या” प्रसिद्ध अभिनेत्रीवर ईडीची मोठी कारवाई, ७ कोटी २७ लाखांची मालमत्ता जप्‍त

दरम्यान, लखनऊ संघ पहिल्यांदाच आयपीएलच्या रणांगणात उतरला आहे. त्यांनी आतापर्यंत ९ सामने खेळताना ६ विजय आणि ३ पराभवांसह हा संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांच्या खात्यात सध्या १२ गुण आहेत.

सीमा सुरक्षा दलात 90 पदांसाठी भरती, 1 लाख रूपये पगाराच्या नोकरीची संधी

मेगा भरती : एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड मध्ये 862 जागांसाठी भरती, मुलाखतीद्वारे होणार निवड !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय