Tuesday, December 3, 2024
Homeविशेष लेखLonghorn beetle बापरे! कोरोना नंतर चीनमधून "ही "नवीन समस्या जगात विध्वंस पसरवणार

Longhorn beetle बापरे! कोरोना नंतर चीनमधून “ही “नवीन समस्या जगात विध्वंस पसरवणार

चीन : व्हायरस म्हणतात सर्वात आधी समोर येतो तो चीन. चीनमधून जगभर भरलेल्या कोरोनाव्हायरसने चांगलंच थैमान घातलं होतं. आता या व्हायरनंतर चीनमधील एका कीटकाने कहर केला आहे. हा कीटक अनेक देशांमध्ये पोहोचला आहे. तो इतका धोकादायक आहे की संपूर्ण जगासाठी संकट बनू शकतो.(Longhorn beetle)

लाँग हॉर्न बीटल नावाचा कीटक चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पोहोचला आहे. लांब शिंग असलेला हा कीटक, ज्याला काही लोक लेडीबग या नावानंही ओळखतात. तो झाडांच्या जीवाचा शत्रू बनला आहे. हा कीटक झाड ते काही दिवसातच खातो. बांबूपासून बनवलेल्या वस्तू काही तासांत नष्ट करतो. तो घराघरात पोहोचला तर वाळवीपेक्षाही घातक असते.(Longhorn beetle)

काय आहे लाँग हॉर्न बीटल?


हे 1924 मध्ये पहिल्यांदा युरोपमध्ये सापडले. हा किडा चीन, तैवान आणि कोरियन द्वीपकल्पात आढळतो. असं म्हणतात की एकदा कुठे हा कीटक आला की त्याला तिथून काढणं अवघडच नाही तर अशक्यही असतं. अमेरिका, दक्षिण आफ्रिका, मध्य पूर्व, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड आणि भारतातील अनेक राज्यांसाठी हे आव्हान आहे.(Longhorn beetle)


काय करतो हा कीटक?

हे इतकं धोकादायक आहेत की ते कोणत्याही झाडात घुसले तरी काही दिवसात ते पूर्णपणे नष्ट करते. झाडांमध्ये गोल छिद्र करून त्यात अंडी घालतो, तिथून ते पसरतात. छिद्रामुळे झाडाला पोषक तत्वं मिळत नाहीत आणि एक दिवस ते सुकते. हा संसर्ग शेवटी झाडांना मारतो. केवळ झाडं कापूनच याचा सामना केला जाऊ शकतो. यामुळे जगभरात अब्जावधी डॉलर्सचे नुकसान होत आहे.(Longhorn beetle)Longhorn beetle! After Corona, “this” new problem from China will wreak havoc in the world

सोफा, डायनिंग टेबल आणि खुर्च्या सर्व काही खातो

जर्मनीतील हॅम्बर्ग युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या मते, जर तो तुमच्या घरात घुसले तर ते सर्व काही खाऊन टाकतो. तुमचा सोफा, जेवणाचं टेबल आणि खुर्च्या. म्हणूनच त्यांना घरांमध्ये उपद्रव निर्माण करणारे कीटकदेखील मानले जातात. अलीकडेच स्वित्झर्लंडमध्ये त्यांनी प्रचंड विध्वंस केला आहे. त्यामुळे जंगलाचा मोठा भाग कापावा लागला. कारण लेडीबगपासून मुक्त होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे संक्रमित झाडं नष्ट करणं. अनेक देशांमध्ये यामुळे बांबू उद्योगाचंही मोठं नुकसान झालं आहे.(Longhorn beetle)

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

आरटीई कायद्यातील बदलाच्या आदेशाची प्रत जाळून पालकांनी केला निषेध!

बापरे! कोरोना नंतर चीनमधून “ही “नवीन समस्या जगात विध्वंस पसरवणार

भरघोस उत्पादन देणारी अशी करा उन्हाळी भुईमूग लागवड

ब्रेकिंग: शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर!

कॉम्रेड राजन क्षीरसागर यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल

DME : वैद्यकीय शिक्षण संचालनालय अंतर्गत 233 जागांसाठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय