Thursday, January 16, 2025
HomeNewsलोणावळा : पावसाचा हाहाकार; सर्वत्र चक्काजाम, रेल्वे रुळावर दरडी कोसळल्या

लोणावळा : पावसाचा हाहाकार; सर्वत्र चक्काजाम, रेल्वे रुळावर दरडी कोसळल्या

लोणावळा : अतिवृष्टीमुळे मावळाला पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून, संपूर्ण तालुका जलमय झाला आहे. लोणावळा खंडाळा व परिसरात तर ढगफुटी सदृश परिस्थिती होती.

लोणावळा खंडाळा व परिसरात अवघ्या तीन तासांतच १७५ मिलीमीटर पाऊस झाल्याचा अंदाज आहे. मावळ, लोणावळा व खंडाळ्यातील शहर व ग्रामीण भागांतील ओढे, नाले व नदीकाठच्या घरांना पाण्याने वेढा घातला आहे. घरांमध्ये चार फूटांपर्यंत पाणी साचले आहे. 

मावळात गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास सुरू झालेला पाऊस सकाळपर्यंत कोसळत होता. पहाटे अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे लोणावळा खंडाळ्यासह मावळातील ओढे, नाले व नदीकाठच्या अनेक गावांतील घरांना पुराने वेढा घातला आहे. रेल्वे मार्गावर दरडी कोसळल्यामुळे रेल्वे सेवा तत्काळ बंद करण्यात आली आहे.


संबंधित लेख

लोकप्रिय