Friday, April 18, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Loksabha 2024 : जिल्हाधिकारी डाॅ. सुहास दिवसे यांनी केली स्ट्राॅग रूमची पाहणी

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डाॅ. सुहास दिवसे यांनी आज मावळ लोकसभा (Maval loksabha) मतदारसंघांतर्गत पिंपरी विधानसभा कार्यालयांतर्गत विविध ठिकाणी भेट दिल्या. त्यामध्ये ऑटो क्लस्टर, चिंचवड येथील मतदान साहित्य वाटप व स्विकृती केंद्र आणि निगडी प्राधिकरण येथील डॉ.हेडगेवार भवनातील स्ट्राॅग रूमची पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांना अत्यावश्यक सोयी सुविधा देण्याबाबत सूचना दिल्या. PCMC NEWS

या भेटी दरम्यान त्यांचेसमवेत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव, मतदान नोंदणी अधिकारी विनोद जळक, तहसीलदार जयराज देशमुख, नोडल अधिकारी विजय भोजने, मुकेश कोळप,प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते. PCMC NEWS

२०६ पिंपरी विधानसभा कार्यालयांतर्गत क्षेत्रीय अधिकाऱ्यांना आज मतदान यंत्राचे प्रशिक्षण देण्यात आले होते, त्याचीही पाहणी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केली व प्रशिक्षकांसमवेत संवाद साधला.

पिंपरी विधानसभा मतदारसंघांमधील विविध भागामधील ८५ इमारतींमध्ये एकूण ३९९ मतदान केंद्रे असून  सर्व मतदान केंद्र ही तळमजल्यावर आहेत. या मतदारसंघातील मतदारांची एकूण संख्या ३ लाख ६४ हजार ८०६ इतकी आहे.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles