Wednesday, April 24, 2024
Homeग्रामीणकळसुबाई हरिचंद्रगड अभयारण्य क्षेत्रात स्थानिकांना मोफत प्रवेश मिळावा - डॉली डगळे

कळसुबाई हरिचंद्रगड अभयारण्य क्षेत्रात स्थानिकांना मोफत प्रवेश मिळावा – डॉली डगळे

भारतीय ट्रायबल पार्टी ची मागणी

राजूर : कळसुबाई हरिचंद्रगड अभयारण्य क्षेत्रात स्थानिकांना मोफत प्रवेश मिळावा, अशी मागणी भारतीय ट्रायबल पार्टी च्या जिल्हा प्रभारी डॉली डगळे यांनी कळसुबाई हरिचंद्रगड वन्यजीव अभयारण्य कार्यालय राजूर व भंडारदरा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. तसेच मागणीचा सकारात्मक विचार न झाल्यास अभयारण्य प्रवेशद्वार तपासणी नाक्यासमोर बसून जन आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर जिल्हातील नाशिक वन्यजीव विभाग अंतर्गत कळसुबाई हरिचंद्रगड वन्यजीव अभयारण्य क्षेत्रात अकोले तालुक्यातील पेसा क्षेत्रातील आदिवासी नागरिक व इतर समाजबांधव यांना अभयारण्य प्रवेशद्वार च्या तपासणी नाकावर विनकारण थांबवण्यात येते. तसेच वनविभाग कर्मचारी व ग्रामविकास वनसमिती च्या सदस्य यांच्या कडून प्रवेशासाठी वाहनशुल्क व प्रति व्यक्ती शुल्क भरून अभयारण्य क्षेत्रातील गांवामध्ये जाण्यासाठी पावती घेण्यासाठी आग्रह केला जातो. अनेक वेळा स्थानिक नागरिक व वन्यजीव कर्मचारी यांच्यात शाब्दिक वादविवाद देखील झालेले आहेत.

अभयारण्य क्षेत्रात पर्यटनासाठी चाललो नाही तर आमचे, नातेवाईक मित्र किंवा सगे सोयरे आप्तेष्ठ या क्षेत्रातील गावी राहत आहेत. त्यांच्याकडे आमचे वैयक्तिक कौंटुबिक कार्यक्रमसाठी किंवा सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक धार्मिक विधी साठी नेहमी जाणे येणे असते. स्थानिक आदिवासी पेसा क्षेत्रातील स्थानिक नागरिकांना स्थानिक ओळखपत्र व स्थानिक डांगाणी बोलीभाषा ओळखून निशुल्क व मोफत प्रवेश आपल्या चारचाकी व दुचाकी वाहानासह देण्यात यावा. जे पर्यटक तालुका बाहेरून अभयारण्य क्षेत्रात पर्यटनासाठी येत आहेत. त्यांच्या कडून आवश्यक प्रवेश शुल्क आकारण्यात यावे. अशीही मागणी करण्यात आली आहे.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय