Friday, April 18, 2025
---Advertisement---
---Advertisement---

मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करू – डॉ.प्रशांत नारनवरे

मागासवर्गीय संस्थांना डिक्कीच्या माध्यमातून नवसंजीवनी मिळेल – पद्मश्री मिलिंद कांबळे

पुणे / क्रांतिकुमार कडुलकर
: वर्षानुवर्षे मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थांच्या अडचणी वाढत आहेत .लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे .या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आस्वासन समाजकल्याण विभागाचे संचालक डॉ.प्रशांत नारनवरे यांनी दिले .मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की) च्या वतीने एक दिवशीय परिषद आयोजित करण्यात आली होती त्यावेळी डॉ. नारनवरे बोलत होते .

---Advertisement---



पुढे ते म्हणाले की ,सुंदर ,स्वच्छ शहर हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे .त्यानुसार नवीन शहरांच्या धोरणामध्ये सुद्धा मागासवर्गीय समाजासाठी कमी दरात घरे मिळण्यासाठी नवीन धोरण आणणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आणि ते लवकर येईल अशी अपेक्षा व्यक्त केली . डिक्की चे संस्थापक अध्यक्ष व आयआयएम जम्मू चे अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे आपल्या मनोगतात म्हणाले की ,मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थांच्या अडचणी या फार किचकट आहेत .त्यावर काम करून मागासवर्गीय समाजाला न्याय देण्यासाठी ही परिषद आयोजीत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले .तसेच डिक्की च्या पाठपुराव्यामुळे गृहनिर्माण संस्थांच्या विकासाला नवसंजीवनी मिळेल असे मत कांबळे यांनी यावेळी व्यक्त केले.



तसेच ते म्हणाले की ,गृहनिर्माण संस्थांना अभय योजना लागू करण्यासाठी व इतर अडचणी सोडवण्यासाठी आपण शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले . नितीन टाकळकर यांनी गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या विविध अडचणी सांगितल्या व त्यासाठी काय करता येईल यासाठी कायदेशीर उपाययोजना सांगितल्या . या कार्यक्रमास नितीन टाकळकर ,जेष्ठ उद्योजक संजय फुलपगर ,डिक्की चे प्रदेशाध्यक्ष मुकुंद कमलाकर ,उपाध्यक्ष सुगत वाघमारे , गौतम भोसले ,अमित अवचरे यासह या क्षेत्रातील अनेक मान्यवर मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते .या कार्यक्रमास पुणे शहरातील विविध मागासवर्गीय गृहनिर्माण सोसायटीचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. डिक्कीचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद कमलाकर यांनी सर्वांचे स्वागत केले , गौतम भोसले यांनी सूत्रसंचालन केले तर संजय फुलपगर यांनी आभार मानले .

‘ट्रॅक कंपोनन्ट्स’च्या कामगारांना तब्बल साडेबारा हजारांची वेतनवाढ !

ज्येष्ठ नागरिक त्रिवेणीनगर संघाचा 14 वा वर्धापन दिन संपन्न


संभाजी ब्रिगेडच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles