पुणे / डॉ.अतुल चौरे : जगाला डिजिटल साक्षरतेची गरज आहे. शिक्षकांच्या माध्यमातून आपण डिजिटल साक्षरतेमध्ये खूप काम करू शकतो. जग बदलू शकतो. युवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करू शकतो. तंत्रज्ञानाप्रमाणे आपणही आपल्यात बदल केला पाहिजे. साक्षरतेच्या माध्यमातून सायबर फसवणुकीची भीती आपण लोकांमधून कमी करू शकतो, यातूनच सुदृढ जागतिक समाज निर्माण करू शकतो, असे प्रतिपादन कॉमर्स फॅकल्टीच्या डीन डॉ. हर्षा गोयल यांनी केले.
हे पहा ! घोडेगाव : वाचन चळवळ हीच समाजपरिवर्तनाची नांदी
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये अर्थशास्त्र व राज्यशास्त्र विभाग अंतर्गत आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस निमित्त आयोजित ऑनलाइन वेबिनार मध्ये प्रमुख पाहुणे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी एस .एम. जोशी कॉलेज चे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे होते.
खिलारे म्हणाले, कोरनामुळे ऑनलाइन शिक्षण सुरू झाले. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षक यांच्यात डिजिटल साक्षरतेची गरज आहे. भारतात फार थोडे लोक डिजिटल साक्षर आहेत. असे असले तरी भारतात आज सुद्धा साक्षरतेचा दर केवळ 77 टक्के आहे. त्यामुळे हा दर वाढवण्याची आवश्यकता आहे. असे ते म्हणाले.
हे पहा ! मंचर : मल्हार प्रतिष्ठान तर्फे गोरगरीब, निराधार व बेघरांना रेनकोट वाटप
प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डॉ. एकनाथ मुंडे यांनी केला. आभार डॉ. सरोज पांढरबळे यांनी मानले. तसेच डॉ. विश्वास देशमुख व डॉ.कांबळे एफ. जे. यांनी सुत्रसंचालन केले.
उपप्राचार्य डॉ.संजय जगताप, उपप्राचार्य डॉ.संजय जडे, आय. क्यू. ए. सी. चेअरमन डॉ. किशोर काकडे व सर्व प्राध्यापक व प्रशासकीय सेवक याप्रसंगी उपस्थित होते.
हे वाचा ! पिंपरी चिंचवड : गणपतीदान व संकलन मोहिमेस प्रतिसाद !