पिंपरी चिंचवड – निगडी प्राधिकरणातील बिबट्याला पकडण्यासाठी वनविभाग, पिंपरी चिंचवड महापालिका, पोलीस प्रशासन यांची संयुक्त टीम अथक काम करत होती. अखेर प्राधिकरण, निगडी येथे एका बंगल्यात बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळाले आहे. (Leopard in Pimpri Chinchwad)
प्रशासनाच्या या कार्यवाहीमुळे स्थानिक नागरिकांना एक मोठा दिलासा मिळालाय. बिबट्याला सुरक्षितपणे जंगलात नेऊन सोडण्यात येणार आहे.
शहरातील मुख्य रहिवाशी परिसरात बिबट्या शिरल्यानं नागरिकांमध्ये मोठं भीतीचं वातावरण निर्माण झाले होते.
Leopard in Pimpri Chinchwad
आज रविवारी वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सोसायटी जवळ असलेल्या संत कबीर उद्यानातील एका पत्र्याच्या शेडच्या बाजूला सापळा लावून बिबट्याला घेण्यासाठी कारवाई सुरू केली. रेस्क्यू टीमनं दोन फायर करून त्यास बेशुद्ध केले. अडीच तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात रेस्क्यू टीमला यश आले आहे.
2006 मध्ये पण पिंपरी चिंचवड शहरात बिबट्या आला होता.
शहरातील निगडी, प्राधिकरण येथील संत कबीर उद्यान परिसरात आज (रविवारी) सकाळी बिबट्याने शिरकाव केला होता. लोकवस्तीत बिबट्याने शिरकाव केल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. वनविभाग, मनपा, पोलीस यांच्या संयुक्त प्रयत्नातून बिबट्या पकडला गेला. नागरिक प्रशासनाच्या टीमचे कौतुक करत आहेत.
पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त बिबटे आहेत. वन्य प्राण्यांच्या अधिवासावर नागरिकी आक्रमण झाल्यामुळे घनदाट जंगलातून बिबटे शिकारीसाठी शहरात शिरत आहेत. हे बिबटे सोपी शिकार म्हणून शहरातील भटक्या कुत्र्यांची शिकार करण्यासाठी येतात, असे तज्ञांचे मत आहे.