मुंबई : मुंबईतील विविध रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा ठराव विधानपरिषदेत संमत करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी हा ठराव मांडला होता. या ठरावानुसार मध्य, पश्चिम, आणि हार्बर रेल्वे मार्गावरील काही प्रमुख स्थानकांची नावे बदलण्याची शिफारस करण्यात आली आहे. (Mumbai)
मध्य रेल्वे मार्गावरील करी रोड रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘लालबाग रेल्वे स्थानक’ असे करण्यात येईल. सॅंडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाचे नाव ‘डोंगरी रेल्वे स्थानक’ असे केले जाईल. पश्चिम रेल्वे मार्गावरील मरीन लाईन्स रेल्वे स्थानकाचे नाव ‘मुंबादेवी रेल्वे स्थानक’ आणि चर्नी रोड रेल्वे स्थानकाचे नाव ‘गिरगाव रेल्वे स्थानक’ असे करण्याचे ठरले आहे. हार्बर मार्गावरील कॉटन ग्रीन स्थानकाचे नाव ‘काळी चौकी रेल्वे स्थानक’, डॉकयार्ड रोड रेल्वे स्थानकाचे नाव ‘माझगाव रेल्वे स्थानक’, आणि किंग्ज सर्कल स्थानकाचे नाव ‘तीर्थंकर पार्श्वनाथ रेल्वे स्थानक’ असे करण्यात येणार आहे. (Mumbai)
या बदलांमुळे स्थानकांच्या आसपासच्या परिसरांचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित होईल, अशी अपेक्षा आहे. स्थानिकांच्या भावनांना आणि परंपरांना मान्यता मिळेल, तसेच स्थानकांची ओळख अधिक सुलभ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्र विधानपरिषद केंद्र शासनास ही शिफारस करणार आहे.
हेही वाचा :
धक्कादायक : 800 हून अधिक विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह, 47 मुलांचा मृत्यू !
भाईंदर रेल्वे स्थानकावर पिता-पुत्राची आत्महत्या, हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ व्हायरल
धक्कादायक! पुण्यात ‘ऑनर किलिंग’, आंतरधर्मीय विवाहाचा राग!
Pune : पुणे येथे भारती सहकारी बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती
वसंत मोरेंचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश, उद्धव ठाकरेंनी दिली मोठी जबाबदारी
मोठी बातमी : राज्यातील अनेक जिल्ह्यात भूकंपाचे धक्के: नागरिकांत भीतीचे वातावरण
दिवसा ढवळ्या बिबट्याचा वावर, दुचाकीस्वार थोडक्यात बचावला
रिलसाठी स्टंट करताना दुचाकीवरून तरुणाचा भीषण अपघात, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल