Thursday, March 28, 2024
Homeग्रामीणसुरगाणा : भारतीय जनता पक्ष ओबीसी सेलच्या वतीने वीर बिरसा मुंडा चौकात...

सुरगाणा : भारतीय जनता पक्ष ओबीसी सेलच्या वतीने वीर बिरसा मुंडा चौकात चक्का जाम आंदोलन

सुरगाणा / दौलत चौधरी : नुकतेच ओबीसी मंडळाच्या चळवळीला २७ टक्के राजकीय आरक्षण मिळाले असून अद्यापही न्याय मिळाला नसून आज दिनांक २६ जून रोजी माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा रास्ता रोको करत निषेध करण्यात आला.

ओबीसींचे राजकीय आरक्षण मिळेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही, सुप्रीम कोर्टाने ओबीसींचे राजकिय आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ सर्व ओबीसी समाज एकवटला असुन भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी सेल व सुरगाणा भाजपा मंडळच्या वतीने वीर बिरसा मुंडा चौक येथे चक्का जाम  आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

महाविकास आघाडी सरकारच्या अकार्यक्षमते मुळे हे आरक्षण रद्द झाले असून जोपर्यंत ओबीसी यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत येणाऱ्या निवडणूका होऊ देणार नाही. व न्याय मिळाला नाही तर पुढील आंदोलन तीव्र करण्यात येईल.

– विजय कानडे, सरचिटणीस

 ओबीसी सेल नाशिक जिल्हा सेल

सुमारे २० मिनिटे बिरसा मुंडा चौक रोखून धरण्यात आली. यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जोपर्यंत ओबीसीचे आरक्षण पुन्हा प्रदान करण्यात येत नाही तोपर्यंत राज्यात कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होऊ देणार नाही, असा इशारा भाजपच्या वतीने देण्यात आला.

यावेळी पोलीस निरीक्षक दिवाणशिंग वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी उपस्थित भारतीय जनता पक्षाचे उपजिल्हा अध्यक्ष रमेश थोरात, पंचायत समिती सदस्य एन. डी. गावित, ओबीसी सेल चे नाशिक जिल्हा सरचिटणीस विजय कानडे, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष सचिन महाले, कैलास सूर्यवंशी, दिनकर पिंगळे, शामभाऊ पवार, छोटू दवंडे, भावडू चौधरी सुनील सेठ, परिटीनी वाले, प्रसाद बागुल,आदींसह बहुसंख्ये कार्यकर्ते उपस्थित होते.


संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय