पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिका विकास आराखड्यातील प्रस्तावित रस्ते ताब्यात घेवून त्याचा विकास करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. मोशी येथील लक्ष्मी चौक ते स्वराज रेसिडेन्सी रस्त्याच्या कामाला गती देण्यात आली आहे. PCMC News
भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी शुक्रवारी महापालिका प्रशासनाचे अधिकारी आणि सहकाऱ्यांसोबत मोशी येथे विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते निखील बोऱ्हाडे, निलेश बोराटे आणि ग्रामस्थ व सोसायटीधारक उपस्थित होते. (हेही वाचा – यूपी सरकारच्या बुलडोजर कारवाईवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दणका, 60 लाख रुपयांचा दंड, पीडितांना नुकसान भरपाईचे आदेश)
मोशी येथे लक्ष्मी चौक ते स्वराज रेसिडेन्सी येथील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित रस्त्याचे काम अखेर मार्गी लागले. महानगरपालिका विकास आराखड्यातील या 24 मीटर रस्त्यावर अतिक्रमण होते. सदर अतिक्रमण आणि शिवरस्त्यावरील बेकादेशीर अतिक्रमणही हटवण्यात आले. त्यामुळे जागा ताब्यात घेऊन रस्त्याचे काम सुरू करण्यात येत आहे, तशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. यामुळे या भागातील स्थानिक नागरिक, वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे. (PCMC) (हेही वाचा – लाडक्या बहिणींनो, एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार? जाणून घ्या सविस्तर माहिती)
असा आहे रस्त्याचा फायदा
1.पुणे-नाशिक रोडची परिसराची अंतर्गत ’कनेक्टीव्हीटी’, 2. भारतमाता चौक ते चिखली गावठाण रस्त्याला पर्यायी रस्ता, 3. रिव्हर सोसायटी, ऐश्वर्यम हमारा, स्वराज, प्रिस्टीन ग्रीन, क्रिस्टल सिटी आदी 30 सोसाट्यांना रस्ता उपलब्ध, 4. सुमारे 10 हजार सदनिकाधारकांसाठी सुविधा, 5. लक्ष्मी चौकाला जोडणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी कमी होणार आहे. (हेही वाचा –धक्कादायक : नवरदेव पसंत नव्हता, नवरीनेच दिली हत्येची सुपारी)
प्रतिक्रिया :
समाविष्ट गावांच्या विकासाच्या मुद्यावर गेल्या 10 वर्षांपासून मतदार संघात काम करीत आहे. महापालिका सत्ता काळात समाविष्ट गावांतील पायाभूत सोयी-सुविधा सक्षम करण्यात आल्या. त्यामुळे ‘‘चिखली-मोशी-चऱ्होली रेसिडेन्सिअल कॉरिडॉर’’ तयार झाला. आगामी काळात उपनगरे आणि शहर यांची ‘कनेक्टिव्हीटी’ वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.
- महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.
(हेही वाचा – ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे निधन, भारतीय सिनेसृष्टीवर शोककळा)