Wednesday, February 5, 2025

कोविड रुग्णाकरिता मोफत वैद्यकीय सल्ला आणि समुपदेशन यासाठी आप हेल्थ विंगची हेल्पलाइन सुरू


पुणे
: आम आदमी पक्ष महाराष्ट्र हेल्थ विंगच्या वतीने गृह विलगीकरणात असलेल्या कोविड रुग्णाकरिता मोफत वैद्यकीय सल्ला आणि समुपदेशन यासाठी हेल्पलाइनची (8929207669) सुरुवात करण्यात आली.  सध्याच्या घडीला अनेक कोविड रुग्ण तसेच त्यांचे कुटुंबीय उपचाराबाबत गोंधळलेल्या आणि भीतीच्या छायेत वावरत आहेत, त्याना डॉक्टरांकडून योग्य वैद्यकीय सल्ला व मार्गदर्शन देणे या हेतुने या मोहिमेची सुरुवात करण्यात येत आहे.

“ग्रामीण भागामध्ये कोविड साथीमुळे अनेक रुग्ण ग्रस्त आहेत. ग्रामीण भागामध्ये आरोग्याच्या सोयी सुविधांचा मोठ्या प्रमाणावर अभाव आहे. अशा परिस्थितीमध्ये आप हेल्थ विंगने सुरू केलेल्या या नव्या हेल्पलाइनमुळे ग्रामीण जनतेला मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार आहे,” असे मत आप महाराष्ट्राचे संयोजक रंगा राचुरे यांनी या हेल्पलाइनचे उद्घाटन करताना व्यक्त केले.

“८९२९२०७६६९ या हेल्पलाइनचा उपयोग ग्रामीण महाराष्ट्रातील नागरिकांना वैद्यकीय मार्गदर्शनासाठी मोठ्या प्रमाणात घेता येईल. या अगोदर आम आदमी पक्षाच्या 7718812200 हेल्पलाईनच्या माध्यमातून मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद सहित १२ शहरात अनेक रुग्णाना बेड, ऑक्सिजन, प्लास्मा आणि औषधे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. आता नवीन हेल्पलाईनच्या माध्यमातून डॉक्टर, नर्सेस यांचे मार्गदर्शन केले जाईल “, असे डॉ. संतोष करमकर, प्रदेश संयोजक आप आरोग्य सेल यांनी सांगितले.

आप आरोग्य सेलचे प्रदेश सह-संयोजक डॉ. अभिजीत मोरे यावेळी बोलताना म्हणाले की, “या हेल्पलाइनमध्ये २० तज्ञ डॉक्टर्स तसेच १० परिचारिकांचा समावेश असेल. या हेल्पलाइनची आज पासून सुरुवात होत आहे. मुंबई येथील ज्येष्ठ फुप्फुस तज्ञ डॉ. त्रिदिब चटर्जी हे देखील यात आपले योगदान देणार आहेत.”

आप प्रदेश सचिव धनंजय शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की “आम आदमी पक्ष लवकरच एका शैडो कॅबिनेटची सुरुवात करणार आहे, या माध्यमातून महत्वाच्या विषयांवर धोरण मांडणी करण्यात येईल. आरोग्य हा विषय राज्यात पक्षाचा मुख्य मुद्द्यपैकी एक असणार आहे.”

यावेळी आप महाराष्ट्र सह संयोजक किशोर मंद्यान, राज्य संघटक विजय कुंभार, राज्य समिती सदस्य द्विजेंद्र तिवारी, मुकुंद किर्दत, डॉ अल्त्मश फैजी, डॉ अमोल पवार, डॉ जाफरी, डॉ अमोल पवार, डॉ जयवंत महाले यांनी या हेल्प लाईनची गरज व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. 


Related Articles

- Advertisement -

Latest Articles