Tuesday, April 22, 2025
---Advertisement---
---Advertisement---

लातूर : किसान संघर्ष समिती तर्फे निदर्शने करत राष्ट्रपतींंना पाठवले निवेदन

---Advertisement---

---Advertisement---

लातूर, दि. २६ : किसान संघर्ष समिती तर्फे निदर्शने करत राष्ट्रपतींंना निवेदन पाठवले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.

किसान आंदोलनास आज रोजी सात महिने झाले, केंद्र सरकार जाणिवपूर्वक झोपेचे सोंग घेऊन शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करत नाही. कामगार विरोधी कायदे परत घेत नाही उलट सार्वजनिक उपक्रम व उद्योग यांचे खासगीकरण करुन आदानी, अंबानी आणि बड्या भांडवलदारांचे लाड पुरवत आहे. विरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहेष असा आरोप यावेळी करण्यात आला.

लोकशाही धोक्यात आली आहे, म्हणून किसान संघर्ष समिती लातूर तर्फे राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले, असेही यावेळी सांगण्यात आले.

यावेळी भाई उदय गवारे, अँड. विजय जाधव, अँड  डि. जी. बनसोडे, सुधाकर शिंदे, प्रताप भोसले, अँड. सुशील सोमवंशी, अँड. भालचंद्र कवठेकर, एकनाथ कवठेकर, सतिश देशमुख, शैलेश सरवदे आदी उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles