Thursday, July 18, 2024
Homeबॉलिवूडलता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनावेळची शाहरूख खानच्या "या" दोन गोष्टींची सोशल मीडियावर जोरदार...

लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनावेळची शाहरूख खानच्या “या” दोन गोष्टींची सोशल मीडियावर जोरदार चर्चा, वाचा काय आहे प्रकरण !

मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज रविवारी  मुंबईतील ब्रीच कँडी होस्पिटल मध्ये निधन झाले. त्यांच्यावर शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गज नेते, अभिनेते यांनी शिवाजी पार्क येथे प्रत्यक्ष येऊन लता मंगेशकर यांचं अंत्यदर्शन घेतलं.

लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनासाठी बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आणि मैनेजर पुजा ददलानी देखील आली होती. त्यावेळी त्यांनी लता मंगेशकर यांचं अंत्यदर्शन घेतलं. यावेळचे दोन फोटो सध्या सोशल प्रचंड व्हायरल होत असून यावर जोरदार चर्चा सूरु आहे. एका फोटोने शाहरुखने अनेक लोकांची मनं जिंकली आहे तर दुसऱ्या फोटोचा शाहरुखचा चूकिचा अर्थ काढला असून टीका करण्यास सुरूवात केली आहे.

ग्रामीण भागातील मुली ही म्हणतात, शेतकरी नवरा नको गं बाई !

पहिल्या फोटोत शाहरुख खान आणि पुजा ददलानी हे एकत्र लता मंगेशकर यांचे अंत्यदर्शन घेत आहे, त्यामध्ये शाहरूख दुवा मागत आहे तर पुजा ददलानीने दोन हात जोडून लता मंगेशकर यांचे अंत्यदर्शन घेत आहे. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून शाहरूखने अनेकांची मने जिंकली आहे. या फोटोवर हाच भारत आहे आणि असाच राहू द्या. एकत्र कसं राहायचं हे आम्हाला माहिती आहे, असं म्हणत कौतुक केलं आहे. 

किरीट सोमय्यांवरील हल्ल्याप्रकरणी ८ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल, शिवसेना नेत्यांना पोलीस अटक करणार?

दुसऱ्या फोटोत शाहरुख खानने लता मंगेशकरांच्या आत्म्याला शांती मिळावी अशी दुवा मागितली आणि प्रथेप्रमाणे लता मंगेशकर यांच्या पार्थिवाच्या दिशेने फुंकर (हवा फुकली) मारली. मुस्लिम धर्मामध्ये दुवा मागितल्यानंतर फुंकर मारण्याची पद्धत आहे. यावरून काहींनी शाहरूखने लता मंगेशकरांच्या पार्थिवावर थुंकल्याचं सोशल मीडियावर पसरवलं आहे.

 मात्र, चुकीची माहिती पसरवणाऱ्यांनाही काही जणांनी चांगलच सुनावलं आहे. 

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय