Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘लाडकी बहीण योजने’ला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. राज्यातील 2 कोटी 26 लाखांहून अधिक महिलांच्या खात्यात योजनेचे हप्ते जमा झाले आहेत. मात्र, विधानसभा निवडणुकांमुळे लागू झालेल्या आचारसंहितेमुळे सध्या योजनेचे हप्ते थांबवण्यात आले आहेत. या निर्णयामुळे तब्बल 10 लाख महिलांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळवू शकलेला नाहीत.
महिला व बालकल्याण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आचारसंहितेमुळे योजनेचे हप्ते तूर्तास थांबवण्यात आले आहेत. याआधी, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे जमा करण्यात आला होता. मात्र, वेळेअभावी काही महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. यामुळे महिला डिसेंबर महिन्यात योजनेचे हप्ते कधी मिळणार, याची उत्सुकतेने वाट बघत आहेत.
याबाबत दोन दिवसांपूर्वी मुक्ताईनगरमध्ये झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महिलांना दिलासा दिला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, आचारसंहिता संपल्यानंतर डिसेंबर महिन्यात महिलांना योजनेचा हप्ता मिळेल. “कुणीही लाडकी बहीण योजना बंद पाडू शकत नाही. सावत्र भावांनी या योजनेत खोडा घातला, त्यांना जोडा दाखवा,” असे मुख्यमंत्री शिंदे यांनी ठामपणे सांगितले.
राज्यात विधानसभा निवडणुका नोव्हेंबर महिन्यात होणार असून, 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. त्यामुळे महिलांना डिसेंबर महिन्यात हप्ता मिळण्याची शक्यता आहे. सध्या, आचारसंहितेमुळे हप्त्यांचे वितरण थांबले असले तरी निवडणुकांच्या निकालानंतर आचारसंहिता संपली की डिसेंबरचा हफ्ता बहिणींना मिळेल अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली होती.
Ladki Bahin Yojana
![whatsapp link](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/whatsapp.gif)
![google news gif](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/google-news-GIF.gif)
हेही वाचा :
अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर, झिशान सिद्दीकींनाही मिळालं तिकीट
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर; मोठ्या शक्तिप्रदर्शनासह, दिग्गज नेत्यांचे अर्ज दाखल
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर; महाविकास आघाडीचा मोठा प्लॅन
दाना’ चक्रीवादळाचा धडाका ; 56 पथके हाय अलर्टवर, महाराष्ट्रात काय परिणाम?
पिंपरी चिंचवडमध्ये दुर्दैवी दुर्घटना ; तीन मजुरांचा जागीच मृत्यू
विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गट सज्ज ; 8 दिग्गज नेत्यांना दिले एबी फॉर्म
इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे दोन गट आमने-सामने?
अजित पवार गटाची यादी जाहीर, वाचा कुणा कुणाला मिळाली संधी
दाना चक्रीवादळ आज धडकण्याची शक्यता, महाराष्ट्रावर होणार का परिणाम?
मनसेची दुसरी उमेदवारी यादी जाहीर; राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात
शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर; मुख्यमंत्री शिंदेंसह अनेक उमेदवारांची नावे घोषित
लॉरेन्स बिश्नोई महाराष्ट्रातून विधानसभा निवडणूक लढवणार? ‘या’ पक्षाकडून मिळाली ऑफर
पुण्यात बड्या नेत्याच्या कारमधून 5 कोटींचं घबाड जप्त
भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर – 99 जागांसाठी उमेदवारांची नावे घोषित