Ladki Bahin Yojana : राज्याच्या अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची मदत देण्याची योजना आहे. ही योजना 1 जुलै 2024 पासून लागू झाली असून, 21 ते 65 वयोगटातील महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी राज्य सरकारने पाऊल उचलले आहे. अनेक महिलांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा झाले असले तरी काही महिलांच्या खात्यात अद्याप पैसे आलेले नाहीत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापूर येथील प्रचार सभेत याबाबत अपडेट दिली. “ज्या महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे अद्याप आलेले नाहीत, त्यांना लवकरच हा लाभ मिळेल. नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता संपल्यानंतर डिसेंबरचे पैसे खात्यात जमा केले जातील, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं.
यासह मुख्यमंत्री शिंदे यांनी योजनेच्या महत्त्वावरही भाष्य केले. त्यांनी सांगितले की, “लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळत आहे. पूर्वी घरात काही खरेदी करायची असेल तर हात पुढे करावा लागायचा, मात्र आता त्या स्वावलंबी होत आहेत.”
या घोषणेमुळे महिलांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
Ladki Bahin Yojana
हेही वाचा :
चार दिवसात सोयाबीनला अपेक्षित दर मिळेल ; भाजपच्या ‘या’ नेत्याची घोषणा
शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस यांनी केली मोठी घोषणा
ईडीच्या दबावामुळे भाजपसोबत गेले ; छगन भुजबळ यांचा खळबळजनक दावा समोर
नरेंद्र मोदींची राज्यातील नऊ सभांची मोहीम सुरू; महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार
मुंडे बहीण-भावावर प्रवीण महाजन यांच्या पत्नीचे गंभीर आरोप
महाविकास आघाडीने जनतेला दिली पाच मोठी आश्वासने; जाणून घ्या सविस्तर
तुमचे पूर्वज मुघलांची चाकरी करायचे ; संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्ला
राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर ; महाविकास आघाडीच्या ‘पाच गॅरंटी’ जाहीर करणार
मुख्यमंत्री शिंदेंच्या दहा मोठ्या घोषणा; राज्यातील बहिणींना मिळणार 2100 रुपये दरमहा