पुणे : पुण्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने जिल्ह्यात बेड्स कमी पडत आहेत. पुण्यात गेल्या 15 दिवसात दररोज चार हजार रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे रुग्णांना ठेवण्यासाठीच्या बेड्सची संख्या कमी झाली आहे. पुण्याच्या रुबी रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे बेडची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे रुग्णालयाने तीन हॉटेल्स भाड्याने घेतल्या या ठिकाणी 180 बेड्स उलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
पुण्यात सध्या व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेड्सची कमतरता जाणवत आहे. त्या पार्श्वभूमीवर आता पुण्यातील लष्कराचं रुग्णालय सर्वसामान्य नागरिकांनासाठी उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात आली. लष्कराच्या रुग्णालयात आयसीयू बेडसह अन्य सुविधाही उपलब्ध आहेत. पुणे प्रशासनानं लष्कराकडे रुग्णालय उलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे. आज संध्याकाळपर्यंत लष्कराकडून उत्तर येण्याची अपेक्षा असल्याचं सांगण्यात आलंय. त्यामुळे लष्करानं जर आपलं रुग्णालय सर्वसामान्य नागरिकांसाठी खुलं करुन दिलं, तर कोरोना संकटात पुणे प्रशासनाला काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस विदारक बनत चालली आहे. पुण्यातही कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे पुण्यातील रुग्णालयेही आता अपुरी पडू लागली आहे.